Maize Research : मका पिकामधील संशोधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरावे

Prashant kumar Patil : महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मका सुधार प्रकल्पांमधील शास्त्रज्ञांनी मक्याच्या सुधारित जातीबरोबरच मका तण व्यवस्थापन व एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन यावरील संशोधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
Vice Chancellor Dr. Prashant Kumar Patil
Vice Chancellor Dr. Prashant Kumar PatilAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मका सुधार प्रकल्पांमधील शास्त्रज्ञांनी मक्याच्या सुधारित जातीबरोबरच मका तण व्यवस्थापन व एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन यावरील संशोधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

Vice Chancellor Dr. Prashant Kumar Patil
Maize Army Worm : मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप

कसबा बावडा येथील मका सुधार प्रकल्पाच्या नूतन इमारत व मक्यावरील लष्करी अळी प्रयोगशाळेच्या उद्‍घाटन कार्यक्रमप्रसंगी कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते. डॉ. पाटील यांच्या हस्ते कुरण प्रक्षेत्रावरील विकास कामांचे उद्‍घाटन करण्यात आले.

Vice Chancellor Dr. Prashant Kumar Patil
Maize Crop Cultivation : मका पिकाचे तंत्र शेतकऱ्यांनी विकसित करावे : प्रशांतकुमार पाटील

या प्रक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय मका व गहू संशोधन संस्था यांच्या वतीने प्रयोग घेतले जाणार आहेत. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख व सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ यांनी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक डॉ. सदाशिव पाटील, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विद्यापीठ अभियंता श्री. डोके यांचे स्वागत केले.

मका सुधार प्रकल्पाची माहिती प्रकल्पाचे मका पैदासकार डॉ. सुनील कराड यांनी दिली. शाहू कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुमार गुरव, ऊस व गूळ संशोधन केंद्राचे कृषीविद्यावेत्ता डॉ. विद्यासागर गेडाम, विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण गजभिये, डॉ. योगेश बन, डॉ. महेंद्र यादव, मका संशोधन केंद्राचे डॉ. सुहास भिंगारदेवे, सुशांत महाडिक आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com