Rescue Camels : हुश्श्…! नाशकात आलेले उंट परतीच्या मार्गावर

Camels In Nashik : राजस्थानमधून नाशिक शहर आणि परिसरात आलेल्या १११ पैकी १२ उंटांचा मृत्यू झाला. या उरलेल्या उंटांना राजस्थानला घेऊन जाण्यासाठी रायकांचे गुरुवारी शहरात दाखल झाले. आज नाशिकहून उंट राजस्थानच्या दिशेने रवाना झाले.
Camels Nashik
Camels Nashikagrowon

Nashik News : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नाशिक शहर आणि जिल्ह्यात उंटाचे जत्थेच्या जत्थे दाखल झाले. अचानक आलेल्या उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. दरम्यान, १२ उंटांचा मृत्यू झाल्याने राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

या उंटांची पुन्हा राजस्थानला रवानगी करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. त्यानंतर आज त्यांना नेहण्यासाठी रायका नाशिकमध्ये दाखल झाले. आज हे उंट राजस्थानच्या दिशेने रवाना झाले.

Camels Nashik
Rescue camels : नाशिकमध्ये आलेल्या उंटांची होणार ‘घरवापसी’; प्रशासनासह सामाजिक संस्थांचा पुढाकार

नाशिकमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला दररोज उंटाचा जत्था दाखल होऊ लागले. अचानक दररोज जिल्हाभरात जिकडे-तिकडे उंटच उंट दिसायला लागले. त्यामुळे प्राणीमित्रांनी हे उंट तस्करीसाठी घेऊन जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने 111 उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. पोट खपाटीला गेलेले, थकलेले, त्राण गळालेले, पायांवर जखमा झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संगोपनाची जबाबदारी पांजरापोळ संस्थेला दिली. तिथे त्यांना चारा, पाणी आणि औषधोपचाराची सोय करण्यात आली. पण, महाराष्ट्राचे वातावरण सहन न झाल्यामुळे १२ उंटाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

दरम्यान, प्रशासनाने राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. तसेच त्यांच्यावतीने राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरापोळ येथे दाखल झाले आहे. हे रायका आज नाशिकहून ९९ उंटांना घेऊन राजस्थानच्या दिशेने रवाना झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com