

Nagpur Urea News : कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ६० हजार टन युरियाची मागणी केली असून, शासनाने ४२ हजार ५८० टन युरिया देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
परंतु मागील वर्षाचा काही साठा असल्याने तुटवडा निर्माण होणार नाही, असे या पार्श्वभूमीवर सांगण्यात आले.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी कृषी विभागाने ४ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यंदा कापसाला भाव नसून पाऊस लांबल्यास शेतकरी सोयाबीनकडे वळण्याचा अंदाज आहे.
धानाचे ९२ हजार, सोयाबीनचे ८९,४०० हेक्टर, तुरीचे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी विभागाने युरिया ६० हजार टन, डीएपी २५ हजार टन अशी मागणी केली आहे.
परंतु युरिया ४२ हजार ५८० टन मिळणार आहे. तसेच डीएपी १९ हजार ५४० टन मिळणार आहे. म्युरो अॅड पोटॅशची ६ हजार टनाची गरज नोंदविली होती. तर, ३ हजार १४० टनांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे या खतांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
इतर खते अधिक प्रमाणात मिळणार आहेत. संयुक्त खताची ४० हजार ४०० टन मागणी असताना ४५ हजार १४० टन पुरवठा होणार आहे.
तसेच सिंगल सुपर फॉस्पेटची ३० हजार ५०० टन मागणी असताना ३५ हजार ७३० टन पुरवठा होणार आहे. १ लाख ६१ हजार ९०० टन मागणी असून, १ लाख ४६ हजार १३० टन पुरवठा होईल, अशी माहिती कृषी विभगाने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.