Water Awareness : जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यावर भर द्यावा : पेरे-पाटील

Bhaskarrao Pere Patil : पाणी मुरविण्यासाठी शोष खड्ड्यांची निर्मिती करावी, असे आवाहन पाटोदा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
Bhaskarrao Patil
Bhaskarrao Patil Agrowon

Parbhani News : प्रत्येक व्यक्तींने दैनंदिन वापर करतांना पाण्याचा अपव्यय टाळावा. आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी सर्वांनी जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यावर भर द्यावा लागेल. पाणी मुरविण्यासाठी शोष खड्ड्यांची निर्मिती करावी, असे आवाहन पाटोदा (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ व पाणी बचतीचे महत्त्व कळावे तसेच सार्वजनिक जलस्रोतांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने गुरुवारी (ता. १४) परभणी जिल्हा परिषद जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय जल जागृती कार्यशाळेत बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंसीकर, जल जीवन मिशन प्रकल्प संचालक विजेंद्र मुंढे, लातूर येथील उद्धव बापू फड,

Bhaskarrao Patil
Crop Insurance Awareness : पीकविम्याची प्रत्येक तालुक्यात फिरत्या रथाद्वारे जनजागृती

गट विकास अधिकारी जे. व्ही. मोडके, जयंत गाडे, व्ही. एम. मोरे, सहायक गट विकास अधिकारी सूर्यकांत किटे आदी उपस्थिती होती. पेरे पाटील म्हणाले, की झाडे लावा झाडांशिवाय पाऊस पडणार नाही. गावाचा विकास हे सरपंच आणि ग्रामसेवकच करू शकतात, गावातील नळांना मीटर बसवा, ग्रामपंचायत मधील आर्थिक सुबत्ता वाढवा, बालविवाह, जन्म- मृत्यू नोंद, कर भरणा करावा.

गट विकास अधिकारी जे. व्ही. मोडके, जयंत गाडे, व्ही. एम. मोरे, सहायक गट विकास अधिकारी सूर्यकांत किटे आदी उपस्थिती होती. पेरे पाटील म्हणाले, की झाडे लावा झाडांशिवाय पाऊस पडणार नाही. गावाचा विकास हे सरपंच आणि ग्रामसेवकच करू शकतात, गावातील नळांना मीटर बसवा, ग्रामपंचायत मधील आर्थिक सुबत्ता वाढवा, बालविवाह, जन्म- मृत्यू नोंद, कर भरणा करावा.

Bhaskarrao Patil
Water Pollution : शेतीतील रसायनांच्या वापराने पाणी प्रदूषणात वाढ

डॉ. घोंसीकर म्हणाले, की सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे. वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालयाचा निमित्त वापर करावा यासाठी लोक जागृती व्हावी. गावे हागणदारी मुक्त अधिक करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. फड म्हणाले, की पाणी आणि वाणी जपून वापरा, वाणीमुळे तुमचा वर्तमानकाळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे.

सूत्रसंचालन अनिल मुळे केले तर आभार वनमाला कोरडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, सेवा पुरवठादार संस्था, अंमलबजावणी साह्य संस्था, गट विकास अधिकारी, विस्ताराधिकारी तसेच जल जीवनमधील जिल्हा व तालुकास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com