Jagdeep Dhankhar : संविधान जागर मोहिमेने स्वातंत्र्यसाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण

Constitution Awareness : स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे.
Jagdeep Dhankar
Jagdeep DhankarAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण संविधान जागर अभियानातून करावे. हा संविधान जागर तरुण पिढीमध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे जाणीव करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरस्वती भुवन या शिक्षण संस्थेत केले.

‘जागर संविधान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे उद्‍घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, सचिव श्रीरंग देशपांडे यांच्यासह विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jagdeep Dhankar
Indian Constitution : भारतीय राज्यघटनेची उद्देशिका डोळ्यासमोर हवीच...

उपराष्ट्रपती म्हणाले, की क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचे सार्थक देशाच्या स्वातंत्र्यात झाले. विविध क्षेत्रांतील धुरीणांनी भारतीय संविधान निर्मितीचे महान कार्य केले. संवाद समन्वय, सामंजस्य, संभाषण यातून आपले प्रजासत्ताक निर्माण झाले. देशात शांततापूर्ण वातावरण राखण्यात राष्ट्रहित असून प्रजासत्ताक स्थापनेचा हाच मूळ उद्देश आहे.

Jagdeep Dhankar
Constitution Building : प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

म्हणूनच प्रत्येक नागरिकांनी भारतीय संविधानाप्रति आदर ठेवून देशात मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्याचे श्री. धनखड यांनी सांगितले. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क नागरिकांनी जागरूकपणे बजावला पाहिजे. यातून लोकप्रतिनिधीची निवड होत असते.

आपण भारतीय असल्याची ओळख लोकशाही राज्यव्यवस्था ही संविधानाने दिलेली देणगी असून प्रत्येक भारतीयांनी राष्ट्रहित प्रथम मानून कर्तव्य बजवावे. संविधान जागर अभियान राष्ट्रवादाला प्रज्वलित करणारे ठरेल असेही श्री. धनखड यांनी सांगितले. याप्रसंगी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या आवारात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी सुदेश धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांनी ‘एक पेड मा के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com