Pune Rain : दुष्काळी भागाला पावसाचा दिलासा

Pune Rain News : पावसाला मागील चार दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. प्रामुख्याने दुष्काळी समजल्या जाणाऱ्या इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला.
 Pune Rain
Pune RainAgrowon
Published on
Updated on

Pune Monsoon Update : पावसाला मागील चार दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. प्रामुख्याने दुष्काळी समजल्या जाणाऱ्या इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये दौंडमधील केडगाव येथे सर्वाधिक ७३ मिमी पाऊस पडला. त्यामुळे पिके चांगलीच तरारली असून रब्बी हंगामात पेरणीसाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 Pune Rain
Rain Update : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात परतीचा पाऊस घेईना उसंत

पावसाचे जवळपास चार महिने होत आले आहेत. या कालावधीत कमीअधिक पाऊस पडला. मागील दीड महिन्यांपासून पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असून मोठा खंड पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे.

त्यातच विहिरींनीही तळ गाठला असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले होते. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे चांगलाच पाऊस कोसळत आहे.

या पिकांमुळे चारा पीके, तूर, कापूस पिकांना काहिसा आधार मिळाला आहे. पश्चिम पट्यातही पावसाच्या अधूनमधून सरी पडत असल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना चांगलीच नवसंजीवनी मिळाली. गेल्या महिन्यापासून पाऊस कमी झाल्याने भात पिके पाण्यावर आली होती. परंतु आता पाऊस झाल्याने पिके चांगली झाली आहेत.

सोमवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेलीतील खडकवासला परिसरात १३ मिमी पाऊस पडला. तर थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली, पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड भागात कमीअधिक सरी पडल्या. भोरमधील वेळू येथे ३० मिमी पाऊस पडला. भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, आंबवडे, संगमनेर, निगुडघर भागात तुरळक सरी पडल्या.

वेल्हा येथेही २५.८ मिमी पाऊस पडला. तर पानशेत, विंझर, आंबवणे भागात ढगाळ वातावरण होते. आंबेगाव येथे १९.३, शिरूरमधील टाकळी १६.८, शिरूर १७, बारामतीतील मोरगाव १९.५, उंडवडी ६४, इंदापुरातील भिगवण ३१, लोणी ३६.५, निमगाव १८, दौंडमधील पाटस ३३.५, वरवंड ४९.८, रावणगाव ३१, बोरीपार्धी ५७, पुरंदरमधील सासवड १७.५, कुंभारवळण १७, वाल्हा १४.८ मिमी पाऊस पडला. इतर भागात अंशत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com