Pune News : अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला निधी अर्थ विभागाने तयार ठेवलेला आहे. तसेच मुंबईत सोमवारी (ता. १३) मुख्य सचिवांसमवेत आढावा बैठक घेऊन मदत वाटपाच्या नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली..वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाची बैठक मांजरी बुद्रुक येथील मुख्यालयात रविवारी (ता. १२) झाली. तसेच व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर कारखाना प्रतिनिधींचे एक चर्चासत्र घेण्यात आले. यानंतर माध्यमांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले, की दिवाळीच्या आधीच अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटीद्वारे मदत जमा करण्याचे नियोजन चालू आहे. .त्याबाबत मुख्य सचिवांना चर्चेसाठी मी बोलावले आहे. यात पूरग्रस्त भागांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेले अहवाल तपासले जाणार आहेत. पावसामुळे ऊस शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात, याचाही आढावा आम्ही व्हीएसआयच्या बैठकीत घेतला..बहुतेक शेतकरी कोणत्या तरी साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जाईल. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज (ता. १३) दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हीसी) बैठक घेण्यात येणार आहे..Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच.पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांकडून शासनाने प्रतिटन १५ रुपये घेण्याचा निर्णय झाल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता श्री. पवार म्हणाले, ‘‘मंत्री समितीच्या बैठकीत १५ रुपयांचा निर्णय झालेला नाही. दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी व पाच रुपये पूरग्रस्तांना देण्यासाठी चर्चा झाली ही वस्तुस्थिती आहे..कारण, मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यात कोट्यवधी रुपये गरिबांना वैद्यकीय सेवेसाठी मदत करावी लागेल. त्यात कारखान्यांचाही सहभाग असल्यास काय हरकत आहे. याबाबत कोणाला काही मत व्यक्त करायचे असल्यास तसा त्याला अधिकार आहे.”.Farmer Relief: पॅकेज अंमलबजावणीच्या जबाबदाऱ्या निश्चित.निवडक शेतकऱ्यांना ‘व्हीएसआय’कडून मदतकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊस लागवडीसाठी निवडक शेतकऱ्यांना आता १८,२५० रुपये प्रति हेक्टरी मदत करण्याचा निर्णय व्हीएसआयने घेतला आहे. तसेच याशिवाय ६७५० रुपये साखर कारखान्याकडून दिले जाणार आहेत. .यात ऊस रोपाची किंमतदेखील घटवून आता तीन रुपयांऐवजी दोन रुपये करण्यात आली आहे. ‘एआय’ची मदत केवळ या वर्षी असून ती चार हजार शेतकऱ्यांना केली जाईल. त्यापेक्षा जास्त शेतकरी पुढे आल्यास मदतीबाबत राज्य शासन पुढाकार घेईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.