Maize Army Worm : खानदेशात मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप कमी

Maize Pest Control : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा वाढली आहे. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोपही यंदा अधिक होता. पण हा प्रकोप दोन महिन्याच्या पिकात आटोक्यात आल्याचे दिसत आहे.
Maize Pest Management
Maize Army WormAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा वाढली आहे. पण पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोपही यंदा अधिक होता. पण हा प्रकोप दोन महिन्याच्या पिकात आटोक्यात आल्याचे दिसत आहे. पिकात किडनाशकांच्या फवारण्या घेऊन ही समस्या काहीशी थांबल्याची स्थिती आहे.

यंदा ज्वारीपेक्षा अधिक मक्याची लागवड खानदेशात झाली आहे. ही लागवड सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख पाच हजार हेक्टरवर मका पीक आहे. तसेच धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, साक्री आणि नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा भागातही बऱ्यापैकी लागवड झाली आहे.

मक्याला सध्या दर स्थिर आहेत. मागील खरीप व रब्बी हंगामातही मका लागवड बऱ्यापैकी होती. कारण चारा व धान्यासाठी शेतकरी पिकाकडे वळले होते. परंतु यंदा लागवड वाढली आहे. या हंगामात सध्याचे दर व विपणन व्यवस्था लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. परंतु पिकात लष्करी अळीचा प्रकोप वाढला होता.

हा प्रकोप दोन फवारण्या घेऊनही काही भागात थांबलेला नव्हता. पण तिसऱ्या फवारणीनंतर ही समस्या कमी झाल्याचे दिसत आहे. एका फवारणीसाठी एकरी किमान १२०० ते १३०० रुपये खर्च झाला आहे. तसेच मजुरी खर्चही लागला आहे. लष्करी अळीमुळे पिकाची हानी झाली आहे. त्यात सुरवातीलाच १५ ते २० टक्के नुकसान झाले.

Maize Pest Management
Maize Army Worm : इंदापुरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

फवारणी वेळेत न घेतल्यास नुकसानीची पातळीही काही भागात वाढली होती. फवारणीत किडनाशके किंवा अळीनाशकांसह संप्रेरके, अन्नद्रव्येदेखील फवारावी लागली. अळीमुळे पिकाची वाढ कमी होते. त्याची पुढे वाढ होऊन वेळेस निसवणी व कापणीदेखील आवश्यक असते. यामुळे शेतकरी त्यात संप्रेरके व अन्नद्रव्ये आदींची फवारणीदेखील घेत होते. पण यात उत्पादन खर्च वाढला आहे.

Maize Pest Management
Maize Army Worm : खानदेशात मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप कायम

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, धरणगाव, एरंडोल भागात मका पीक आहे. या भागात सर्वत्र अळीचा प्रकोप दिसत होता. काही मका वाण अळीला प्रतिकारक्षम असल्याची बतावणी बियाणे विक्रेते व इतर प्रतिनिधी करीत होते. परंतु सर्वच वाणांवर अळीचा प्रकोप दिसला.

प्रकोप झाल्यानंतर पाने पांढरी होणे, त्याला छिद्रे पडणे अशा समस्या दिसल्या. तसेच पोंग्याची कुठलीही वाढ होत नव्हती. त्यात अळीचा सतत उपद्रव सुरू होता. मध्यंतरी ढगाळ वातावरण होते. तसेच थंडी कमी होती. यामुळेदेखील अळीचा प्रकोप होण्यास अनुकूल स्थिती तयार होत होती. पण फवारण्या व योग्य खत, पाणी नियोजन करून शेतकऱ्यांनी या अळीची समस्या कमी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com