Solar Energy : सौर कृषी वाहिनीतून भरवशाचा वीजपुरवठा

Solar Electricity : सहा जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पाचे लक्ष्य सुमारे १०३४ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष असून त्यासाठी एकूण ५ हजार १७१ एकर जमिनीची आवश्यकता आहे.
Meeting
Meeting Agrowon

Nagpur Solar News : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे कृषिपंपांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा मिळणार असल्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासकीय व खासगी जमीन प्राधान्याने उपलब्ध होईल या दृष्टीने जिल्हास्तरावर कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी शुक्रवारी (ता.१६) दिल्या आहेत.

Meeting
Solar Power Generation : नांदेडला १०१६ मेगावॉट सौरवीज निर्मिती होणार

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा प्रधान सचिव श्रीमती शुक्ला यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी तसेच नागपूर विभागाचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर विभागातील या सहा जिल्ह्यांत एकूण २७७ कृषिप्रवण वीज उपकेंद्रे आहेत.

या सहा जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पाचे लक्ष्य सुमारे १०३४ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष असून त्यासाठी एकूण ५ हजार १७१ एकर जमिनीची आवश्यकता आहे. विभागात आतापर्यंत २९९ वीज उपकेंद्र परिसरात ३ हजार ५४१ एकर जागा उपलब्ध झाली असून उपकेंद्राच्या परिसरात खासगी तसेच शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश शुक्ला यांनी दिल्या.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी वाहिन्यांचे प्रत्येक जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिन्या या सौरऊर्जेवर आणण्याचे धोरण असल्यामुळे जिल्हाधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध होईल या दृष्टीने वीज उपकेंद्राच्या परिसरात जागेची उपलब्धता करताना समूह पद्धतीने जागा उपलब्ध होत असेल तर प्राधान्य देण्यात यावे, असेही त्या म्हणाल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com