Crop Insurance : पीकविम्यासाठी एक कोटी ५७ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

Kharif Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मंगळवारपर्यंत (ता. ३०) १ कोटी ५७ लाख ८६ हजार ११७ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी नोंदणी केली आहे.
Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मंगळवारपर्यंत (ता. ३०) १ कोटी ५७ लाख ८६ हजार ११७ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी नोंदणी केली आहे. पीकविमा नोंदणीसाठी बुधवारी शेवटची मुदत आहे. गेल्या २४ तासांत झालेली नोंदणी १ लाख ८८ हजार ८८५ शेतकऱ्यांनी पीकविमा नोंदणी केली आहे. मात्र मागील वर्षीपेक्षा यंदा कमी शेतकरी पीकविमा नोंदणी करण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी एक रुपयात पीकविमा नोंदणी करण्याची घोषणा केल्यानंतर १ कोटी ७० लाख ६४ हजार, ४४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मागील खरीप हंगामात ११३.२३ लाख हेक्टर जमीन विमा संरक्षित केली होती. यंदा हे क्षेत्र एक दिवसाचा अवधी शिल्लक असताना १०४ लाख हेक्टर संरक्षित झाले आहे.

Fruit Crop Insurance Scheme
Crop Insurance Compensation : खरिपासाठी अकराशे कोटींची विमा भरपाई

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून पीकविमा हप्ता भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. शेतकऱ्याला एक रुपयात पीकविमा देण्याची घोषणा केल्यानंतर मागील हंगामात १ कोटी ७० लाख, ६७ हजार ४४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मागील वर्षी नऊ विमा कंपन्यांना ८ हजार १५ कोटी ३९ लाख रुपयांचा विमा हप्ता देण्यात आला होता.

यापैकी पेरणीपूर्व प्रतिकूल परिस्थितीसाठी १४ कोटी २ लाख रुपये, स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी १४८९ कोटी, मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीपोटी २५८० कोटी २१ लाख, काढणी पश्‍चात भरपाईपोटी ११८ कोटी ६ लाख, पीक कापणी प्रयोगावर आधारित ३०६९ कोटी १५ लाख अशी एकूण ७२७१ कोटी रुपयाची भरपाई निश्‍चित करण्यात आली होती.

Fruit Crop Insurance Scheme
Crop Insurance Company : पीकविमा न देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार

त्यापैकी केवळ ४ हजार १२३ कोटी ३७ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यातील सर्वांत कमी रक्कम ३५२ कोटी ५४ लाख रुपये पीक कापणी प्रयोगावर आधारित वितरित झाले आहेत. यातील २७१६ कोटी ६१ लाख रुपये अद्याप विमा कंपन्यांनी दिलेले नाहीत. मागील खरीप हंगामातील ३१४८ कोटी १ लाख रुपये नुकसानभरपाई अद्याप प्रलंबित आहे.

गतवर्षीचा आकडाही गाठणे मुश्‍कील

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पीक विमा नोंदणीला प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा कृषी विभागाला होती. मात्र, नोंदणीचा वेग पाहता मागील वर्षाचा आकडाही गाठता येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com