Land Document Registration : राज्यातील दस्तनोंदणी उद्यापासून पाच दिवस बंद राहणार

Bhumi Abhilekh : सोलापूरसह राज्यात शनिवारपासून (ता.१२) क्लाऊड मायग्रेशनसाठी व्हर्च्युअल ट्रेझरीने १६ अॅाक्टोबरपर्यंत ग्रॅास सर्व्हर प्रणाली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
documents registration
documents registration
Published on
Updated on

Solapur News : सोलापूरसह राज्यात शनिवारपासून (ता.१२) क्लाऊड मायग्रेशनसाठी व्हर्च्युअल ट्रेझरीने १६ अॅाक्टोबरपर्यंत ग्रॅास सर्व्हर प्रणाली बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या पाच दिवस दस्तनोंदणी बंद राहणार आहे.

शनिवारी (ता.१२) आणि रविवारी (ता.१३) हे सुटीचे दिवस वगळता सोमवारी (ता.१४) ते बुधवारी (ता.१६) शेतजमीन, घर व जागा खरेदी-विक्रीचे दस्तनोंदणी होऊ शकणार नाहीत.

documents registration
Land Dispute : जमिनीचे मतलबी वाटप ठरले अडचणीचे

राज्यभरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्तनोंदणी राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क ग्रॅाससर्व्हर प्रणालीद्वारे होते, व्हर्च्युअल ट्रेझरीने क्लाऊड मायग्रेशनसाठी १२ ते १६ अॅाक्टोबर या कालावधीत हे सर्व्हर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

documents registration
Land Dispute : अति उत्साहीपणा आला अंगलट

त्यानुसार राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आले असून, त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहदुय्यम निबंधकांना पुढे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पाच दिवसाच्या या कालावधीत दस्तनोंदणीसह चलन तयार कऱणे, चलन पडताळणी किंवा चलन विरुपित करण्याची प्रक्रिया करता येणार नाही.

ॲग्रो विशेष

दररोज ४०० दस्त नोंदणी

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात दररोज ४०० वर दस्त नोंदणी होतात. या कालावधीत साधारण १२०० हून अधिक दस्त नोंदणीची कामे खोळंबणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com