Cotton Soybean Registration : कापूस, सोयाबीन मदत योजनेची नोंदणी १३ लाखांच्या पुढे

Cotton Soybean Assistance : हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी राज्यात आतापर्यंत १३ लाखांहून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
Cotton Soybean Registration
Cotton Soybean Registration Agrowon
Published on
Updated on

Pune News : हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी राज्यात आतापर्यंत १३ लाखांहून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. कृषी सहायकांनी बहिष्कार टाकल्यामुळे यापूर्वी नोंदणीची कामे रखडली होती.

राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत वाटली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ई-पीक पाहणीची सर्व आकडेवारी महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे आली आहे. कृषी विभागाने या माहितीमधील शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या गावनिहाय प्रसिद्ध केल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती कृषी सहायकाकडे देणे सुरू केले आहे.

Cotton Soybean Registration
Cotton, Soybean Madat : कापूस, सोयाबीन अनुदान १० सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

शेतकऱ्यांकडून आलेली माहिती सरकारी संकेतस्थळावर भरण्याची म्हणजेच नोंदणी करण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर सोपवली होती. परंतु, मधल्या काळात सहायकांनी या कामावर बहिष्कार टाकल्यामुळे राज्यभर नोंदणीची कामे ठप्प होती. शासनाने आता कृषी सहायकांना प्रतिनोंदणी २० रुपये सेवाशुल्क देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सहायकांनी बहिष्कार मागे घेत नोंदणीची कामे वेगाने सुरू केली आहेत.

कृषी सहायकांनी सोमवारी (ता. २) रात्रीनंतर १३ लाखांच्या पुढे शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. ही नोंदणी ई-पीक पाहणीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांपुरती मर्यादित आहे. यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस, सोयाबीन असल्याबाबत महसूल खात्याने स्वतंत्र यादी तयार केली व ती तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्यास उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणीदेखील केली जाईल, असे कृषी विभागाने राज्य शासनाला कळविले आहे.

Cotton Soybean Registration
Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं

शेतकऱ्याने आधार क्रमांक दिल्यानंतर कृषी सहायकाकडून सरकारी संकेतस्थळावर संबंधित शेतकऱ्याचे नाव व आधार क्रमांकाची नोंदणी केली जाते. त्यानंतर नोंदणीचा हाच तपशील नमो शेतकरी सन्मान योजनेतील नावांशी व आधार क्रमांकाशी संलग्न करुन पडताळला जात आहे. याचाच अर्थ नमो योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्याला तो कापूस किंवा सोयाबीन मदतीसाठी पात्र असल्यास हेक्टरी पाच हजारांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

एका पिकासाठी कमाल दोन हेक्टरपर्यंत आणि दोन्ही पिके असली तरी कमाल प्रत्येकी दोन, दोन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याकडे दोन्ही पिके असल्यास त्याच्या बॅंक खात्यात कमाल २० हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम येत्या दोन आठवड्याच्या आत जमा होण्यासाठी राज्य शासनाच्या ‘महाआयटी’ची मदत घेतली जात आहे.

यादीत नसलेल्यांना मदतीबाबत अस्पष्टता

महसूल विभागाने ई-पीकपाहणीच्या आधारे तयार केलेला ९६ लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाला पाठवली आहे. यात ८०.६० लाख व्यक्तिगत शेतकरी असून १५.४७ लाख शेतकरी सामूहिकपणे पीक लागवड करणारे आहेत. मनो शेतकरी सन्मान योजनेत ९१ लाख शेतकऱ्यांची नावे आहेत. मात्र, नमो शेतकरी सन्मान योजनेत नसलेल्या तसेच ई-पीकपाहणी यादीच्या नसलेल्या पण कापूस व सोयाबीन पिकवत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com