CM Youth Training Scheme
CM Youth Training SchemeAgrowon

CM Youth Training Scheme : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत मनुष्यबळासाठी नोंदणी करावी

IAS Jitendra Dudi : खासगी संस्थांनी २० टक्के व शासकीय विभागांनी मंजूर पदांच्या ५ टक्के या योजनेंतर्गत ऑफलाइन मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करावी.
Published on

Satara News : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. खासगी संस्थांनी २० टक्के व शासकीय विभागांनी मंजूर पदांच्या ५ टक्के या योजनेंतर्गत ऑफलाइन मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

CM Youth Training Scheme
NAMO Shetkari Scheme : ‘नमो शेतकरी महासन्मान’चा चौथा हप्ता दोन दिवसांत

जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मनुष्य उपलब्धतेबाबत मागणी करावी, अशा सूचना करून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात बँकांची संख्या जास्त आहे याची माहिती जिल्हा निबंधक व अग्रणी बँकेने घ्यावी व २० टक्के मनुष्यबळाची मागणी करावी.

CM Youth Training Scheme
Debt Relief Scheme : ‘महात्मा जोतिराव फुले’ कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करा

शिक्षण विभागानेही जिल्ह्यातील महाविद्यालयांची मागणी घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्त्या द्याव्यात. या योजनेंतर्गत शासनामार्फत प्रत्येक महिन्याला सहा महिन्यापर्यंत पगार दिला जाणार आहे.’’मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा जास्त फायदा शिक्षण विभागाला होणार आहे. शिक्षण विभागाने डीएड, बीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना ६ महिन्यांसाठी नियुक्त्या द्याव्यात. त्यामुळे जेथे शिक्षक पदे रिक्त आहेत अशा ठिकाणी पदे मिळतील. उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा’

सहायक कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा उद्योग केंद्राने उद्योगांशी संपर्क साधून जास्तीत जास्त मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या. तसेच या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com