Labour Shortage in MGNREGA: मजुरांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर येणाऱ्या मजुरांची संख्या घटली आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम मजुरांच्या उपस्थितीवर होत असून, सध्या जिल्हाभरात १६ हजार ९६२ मजूर कामावर आहेत. .महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना वर्षाला १०० दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. या योजनेतून जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरुस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका आदी पारंपरिक कामे केली जातात..Labour Wages : पालघर जिल्ह्यात ‘रोहयो’ तील कोट्यवधींची मजुरी थकित.याशिवाय सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्षलागवड, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन, शौचालय, रस्ता खडीकरण, मुरुमीकरण, सिमेंट रस्ता, डांबरी रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण अशा कामांचाही योजनेत समावेश आहे..जिल्हा परिषद प्रशासनाने रोजगार हमीतून घरकूल बांधकामांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात रोहयोअंतर्गत ३ हजार ४९२ कामे सुरू आहेत. यामध्ये जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाची ३ हजार ८२ कामे, तर वन, पाटबंधारे आणि बांधकाम विभागांची ४१० कामे सुरू आहेत..Kanda Chal Subsidy : ‘रोहयो कांदाचाळ’ योजनेतून वैयक्तिक शेतकरी वगळले.सुरू असलेल्या कामांमध्ये घरकूल बांधकामांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय शोषखड्डे, रस्त्याची कामे आणि फळबागांशी संबंधित कामेही सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेवर सर्वाधिक मजूर जामखेड आणि कर्जत तालुक्यांत आहेत. राहुरी तालुक्यात मजुरांची उपस्थिती सर्वांत कमी आहे. वाढत्या उन्हामुळे मजुरांची संख्या कमी झाल्याचे सांगितले जात आहे..तालुकानिहाय मजुरांची उपस्थितीतालुका मजूरसंख्याअकोले १,२२२जामखेड २,६००कर्जत ७,५२७कोपरगाव १८०नगर २१०नेवासे १,०९८पारनेर २४३पाथर्डी २,२१२राहाता २६०राहुरी ७०संगमनेर ३१६शेवगाव ६६१श्रीगोंदे ४२३श्रीरामपूर ३८४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.