Agrowon Sanvad : शिफारशीनुसार खत मात्रा दिल्यास उत्पादन खर्च कमी

Agriculture Expert Anil Yeshe : जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन शिफारशीनुसार खताची मात्रा विकास दिल्यास खर्च कमी करता येतो. याशिवाय जमिनीची पोत सुधारतो.
Agriculture expert Anil Yeshe
Agriculture expert Anil YesheAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मका हे जास्त अन्नद्रव्याची मागणी असलेले पीक आहे. त्यामुळे मका पिकाचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. माती पाणी परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन शिफारशीनुसार खताची मात्रा विकास दिल्यास खर्च कमी करता येतो. याशिवाय जमिनीची पोत सुधारतो, असे मत कोरोमंडल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे कृषी विद्या तज्ज्ञ अनिल येशे यांनी मांडले.

भायगाव (ता. मालेगाव) येथे शनिवारी (ता. २०) रोजी ‘ॲग्रोवन व कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘दर्जेदार मका पीक व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, पटेल एजन्सीचे संचालक प्रफुल्ल पटेल, कृषी अधिकारी आर. पाटील, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे अमित खांदे, चेतन जाधव आदी उपस्थित होते.

Agriculture expert Anil Yeshe
Agrowon Sanvad : सोयाबीन, मका पिकांमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

येशे म्हणाले, की शेतकऱ्यांनी खताची निवड पिकाच्या अवस्थेनुसार करावी जमिनीतील सेंद्रिय कर्ब पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. या वेळी त्यांनी माती पाणी नमुना कशा पद्धतीने घ्यावा हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले

Agriculture expert Anil Yeshe
Agrowon Sanvad : सोयाबीन, कापसामध्ये मृत सरी काढा : डॉ. गरुड

गोरडे म्हणाले, की माती ही सजीव असून तिचे आरोग्य तपासणी गरजेचे आहे. त्यामुळे माती पाणी परीक्षण महत्त्वाचे आहे मका पिकावरील कीड-रोग याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती या वेळी त्यांनी दिली.

अमित खांदे यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी चेतन पवार, अनिकेत काकुळते, ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी रोहन पाटील उपस्थित होते. कार्यक्रम संयोजनात स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र भायगावचे संचालक अमोल पाटील यांनी सहकार्य केले. अमित खांदे यांनी आभार मानले, तर ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी सुनील रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com