Chhatrapati Sambhajinagar: गायरान जमीन व त्यातील पिके, घरे, जनावरे आदींचे नुकसान झालेल्या गायरान धारकांना देखील कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एकरी ७० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी लाल बावटा शेतमजूर युनियनने केली. यासाठी सोमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. .अदानी व इतर भांडवलदाराना ज्याप्रमाणे उद्योगासाठी प्रतिवर्ष प्रति एकर १ रुपये लीजवर शासकीय जमिनी दिल्या जातात त्याप्रमाणे गायरान जमीन धारकांनाही ५० वर्षांच्या भाडे तत्त्वावर दरवर्षी एकरी १०० रुपये दराप्रमाणे कसण्यासाठी लीजवर जमिनी द्या, अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली..Grazing Land Encroachment : गायरान जमिनीवरील अतिक्रमण ‘जैसे थे’.मागण्यांबाबत राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांना निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून मदत देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. .या पार्श्वभूमीवर निवेदनात करण्यात आलेल्या इतर मागण्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे १७ जुलै २०२५ चे परिपत्रक तातडीने रद्द करावे व गायरान धारकांमध्ये पसरलेली दहशत दूर करावी, १९९१ च्या जीआर मधील तारीख बदलून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करा, सौर ऊर्जा व विकासाचे प्रकल्प गायरानात राबवू नका, मंजूर झालेली घरकुले बांधण्यासाठी गावठाणात किंवा गायरानात जागा द्या, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेत योग्य ते बदल करून सर्व भूमिहीनांना त्याअंतर्गत जमिनी द्या, या मागण्या करण्यात आल्या..Grazing Land : गायरान जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात .आंदोलनात लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ. प्रा. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. गणेश कसबे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉ. अभय टाकसाळ, कॉ. मधुकर खिल्लारे, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. अशोक जाधव, गंगापूर तालुका शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कॉ. हरिभाऊ हाटकर कॉ. संतोष काळे, कॉ. शेख नूर, कॉ. गणेश सुसे, सुभाष बात्तीसे.उत्तम बात्तीशे, सखुबाई साबळे, कामान्बाई जाधव, कोकिला आव्हाड, कॉ. रुख्मण श्रीखंडे, रघुजी खंडागळे, नरसिंग कोकाटे, काशिनाथ कुकलारे, बबन बोराडे, हलीम शेख, कमाल तिन्गोते, एकनाथ सुसे, शेख हुसैन, मीनाबाई पवार, सलीम सयाद, आसाराम गाढे, योगेश सुसे, नवनाथ साळवे यांच्यासह १०० ते १५० गायरानधारक सहभागी झाले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.