Sudhakar Badgujar : ठाकरे गटाच्या बडगुजर यांच्या मागणीनुसार होणार ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी

Recounting of EVM machines In Nashik : राज्याच्या विविध भागात ईव्हीएम मशीनबाबत तक्रारींचा सुर उमटत आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यात फेर मतमोजणीला परवानगी दिली आहे.
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाच्या बडगुजर यांच्या मागणीनुसार होणार ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पण विविध मतदारसंघात ईव्हीएममध्ये घोळ असून मतांमध्ये फेरफार केल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. अशीच तक्रार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मतदारसंघातील ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करण्यास परवानगी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा महायुतीने केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान महाविकास आघाडीसह, राज ठाकरे यांच्या मनसे आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफारवरून शंका व्यक्त करताना टीका केली होती. तर अनेक नेत्यांसह उमेदवारांनी फेर मतमोजणी करावी, अशी मागणी केली आहे.

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाच्या बडगुजर यांच्या मागणीनुसार होणार ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी
Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा केला होता. तसेच लागलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी फेर मतमोजणी करण्यास परवानगी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदारसंघातील ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. तर बडगुजर यांना प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरून ही फेर मतमोजणी करावी लागणार आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या असून त्यांचा ६८ हजार १७७ मतांनी विजय झाला आहे. तर हिरे यांना १ लाख ४१ हजार ७२५ मते मिळाली असून बडगुजर यांना ७३ हजार ५४८ मते पडली असून ते दुसऱ्या स्थानावर राहिले. तर मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना ४६ हजार ६४९ मते मिळाली आहेत.

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाच्या बडगुजर यांच्या मागणीनुसार होणार ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; मंत्रिमंडळाचा शपथविधी ७२ तासांत?

मनीषा वायकरांची न्यायालयात धाव

मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मनीषा वायकर यांनी फेर मतमोजणी संदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनंत बी नार यांनी पराभूत केला असून वायकर यांनी फेर मतमोजणीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज केला होता. पण तो वेळेत न पोहचल्याने फेरमोजणी घेण्यात आली नाही.

बाळासाहेब थोरातही करणार अर्ज

राज्यभर ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी समोर येत असतानाच नाशिकमध्ये फेर मतमोजणी होणार आहे. तर औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात फेर मतमोजणीसाठी आग्रही आहेत. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com