Raigad Water Scarcity : रायगड जिल्ह्यात पावसातही अनेक गावे तहानलेलीच

Water Crisis : मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक मुसळधार पाऊस पडला असला तरी रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Raigad News : मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक मुसळधार पाऊस पडला असला तरी रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, चार दिवसांपूर्वी शनिवारी (ता. २४) ४३ गावे आणि २४२ वाड्यांमधील एकूण एक लाख १३ हजार नागरिकांना पाणीटंचाई जाणवत होती.

यासाठी प्रशासनाकडून ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र मुसळधार पावसात सर्व टॅंकर बंद करण्यात आले आहेत. पाणी वाहून गेल्‍याने नैसर्गिक पाणवठे पाऊस थांबताच कोरडे पडतात. तर ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी आहे, ते पिण्यायोग्‍य नसल्‍याने ६० टक्के टंचाईग्रस्‍त गावे अद्याप तहानलेली आहेत. त्‍यामुळे पिण्यासाठी जारद्वारे विकतचे पाणी घेण्याशिवाय त्‍यांच्याकडे पर्याय नाही.

Water Scarcity
Jalna Water Scarcity : जालना जिल्ह्यातील मध्यम, लघू प्रकल्पांनी गाठला तळ

दरवर्षी पावसाला सुरू झाल्‍यावरही टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदा मे महिन्यात झालेल्‍या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा दिला; मात्र हे पाणी वाहून गेल्‍याने टंचाईग्रस्‍त गावांना पुन्हा टंचाईच्या झळा बसू लागल्‍या आहेत. पाऊस सुरू होताच जिल्हा परिषदेने टँकर बंद करण्याचा निर्णय घेतल्‍याने नागरिकांना पदरमोड करून जारमधील पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : परभणी जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा

पेणमधील शिर्कीचाळ, दादर, रावे गावांत, अलिबागमधील मिळकतखार, सारळ या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांची टंचाई कायम आहे. सर्वाधिक पाणीटंचाई महाड तालुक्यात आहे. मेमध्ये येथील बहुतांश पाणवठे आटले असून जलजीवनच्या योजनाही कुचकामी ठरल्या आहेत. शनिवारपर्यंत महाड तालुक्यात ११ गावे आणि ११६ वाड्यांना तर पनवेलमध्ये चार गावे आणि १४ वाड्यांत टंचाई होती.

पाच तालुक्यांमधील टंचाई नियंत्रणात

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई नियंत्रणात आहे. सुधागड, पाली, रोहा, म्हसळा, मुरूड, तळा या तालुक्यांमध्ये आजघडीला एकही गाव, वाडी टंचाईग्रस्त नाही, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेला आहे. तर यापूर्वी टॅंकरमुक्त तालुका म्हणून उल्लेख केला जात असलेल्‍या अलिबाग तालुक्यातही दोन टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे.

सध्या सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुढील अनेक दिवसांचा पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करणे थांबवले आहे; जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्‍या गावांत पिण्याच्या पाण्याची समस्‍या असेल त्‍या गावांत पुन्हा टँकर पुरवठा करण्यात येईल.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com