Solapur News: माढा तालुक्यातील बेंबळे येथील शेतीनिष्ठ ऊसभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांनी पुन्हा एकदा विक्रमी उसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. त्यांनी फक्त ३० गुंठ्यांमधून तब्बल ८७ टन ऊस उत्पादन घेतले असून, सरासरी एकरी ११६ टनांचा उच्चांकी उतारा त्यांनी मिळवला आहे..कोसी ८६०३२ या आडसाली जातीच्या उसाला ५१ ते ५५ कांड्या असून एका उसाचे वजन तीन ते चार किलोपर्यंत आहे. जमिनीची सुपीकता, योग्य खत व्यवस्थापन आणि ठिबकद्वारे अचूक पाणीपुरवठा केल्यास उसाचे शंभरी पार उत्पादन घेणे शक्य असल्याचे श्री. हुलगे यांनी सिद्ध केले आहे. या आधी त्यांनी उसाचे सर्वाधिक एकरी १३६ ते १२५ टनाचे उत्पादन घेतले आहे. यंदाही एकरी ११६ टनांचे सरासरी उत्पादन त्यांनी घेतले आहे. .Sugarcane Farming: अहिल्यानगरला चौतीस हजार हेक्टरवर ऊस लागवड.यंदा ऊस तोडणीवेळी कृषिरत्न डॉ. संजीव माने, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड, तसेच महावीर मोरे, सचिन ढवळे, राजेंद्र कोळेकर, अमोल गळगुडे, गणेश हुलगे, नागनाथ भगत, रामराजे हुंबे आदी उपस्थित होते..केळीपीक मोडल्यानंतर हुलगे यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तागाच्या हिरवळीचे खत पिकवून जमिनीत गाडले. उभी-आडवी नांगरट करून मशागत केली. मे महिन्यात सरी पद्धतीने मिश्र खतांचा बेसल डोस देत मातीआड केली. त्यानंतर ठिबक संच बसवून पाच बाय दीडफूटावर बेणे लागवड केली..Sugarcane Farming : अतिवृष्टिबाधित ऊस पिकात करावयाच्या उपाययोजना.७० दिवसांनी दुसरा बेसल डोस व बाळ बांधणी, तर ११० दिवसांनी मोठी बांधणी करून पिकाला पूरक पोषण देण्यात आले. ठिबकद्वारे सेंद्रिय स्लरी, गांडूळ खत व संजीवक द्रावण वेळोवेळी दिल्यामुळे उसाच्या वाढीस मोठा हातभार लागला. ड्रोन आणि पाठीवरील पंपाद्वारे संजीवकांची फवारणी करून त्यांनी पिकाची सशक्त वाढ साधली. .‘‘जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवला आणि ठिबकद्वारे खत व्यवस्थापन योग्य केले, तर शंभरी पार उत्पादन घेणे कठीण नाही,’’ असे हुलगे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी ‘ऊस उद्दिष्ट शंभर प्लस’ या व्हॉट्सअॅप गटाच्या माध्यमातून हुलगे मार्गदर्शन करतात. विविध जातींचा बेणे प्लॉटही त्यांनी तयार केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.