Farmer Awareness: बाळापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत तालुकास्तरीय आत्मा शेतकरी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र नेमाडे यांची बिनविरोध निवड केल्या गेली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे, मंडळ कृषी अधिकारी राहुल शिरसाट तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांनी नवनिर्वाचित सदस्यांना आत्मा समितीची भूमिका, उद्दिष्टे आणि कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली..बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे आणि बबलूभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे गठन करण्यात आले. त्यानंतर आयोजित बैठकीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.Farmer Advisory Committee.Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती .या निवडीचा प्रस्ताव समिती सदस्य ज्ञानेश्वर म्हैसने यांनी मांडला, तर ऋषिकेश वाकडे यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी आत्मा समिती सदस्य ज्ञानेश्वर म्हैसने यांनी शेतीपूरक प्रक्रिया उद्योग, मृदा परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन, रासायनिक खतांचा कमी वापर, तालुक्यात नवीन कृषी प्रकल्प उभारणी तसेच शासकीय योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले..Agricultural Fertilizer Policy: कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नेमाडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आत्मा समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. तालुका शेतकरी सल्लागार आत्मा समितीमध्ये ज्ञानेश्वर म्हैसने, रवींद्र नेमाडे, गोपाल उगले, राखी वंजारे, सत्यभामा भिवटे, ज्योत्स्ना हागे, प्रमिलाताई मते, दिलीप लांडे, लक्ष्मीताई कारंजकर, प्रभाकर मते, शरद लांडे, .सुनंदाताई भानगे, ज्योतीताई तायडे, रेखाताई मानकर, पुष्पाताई जढाळ, मायाताई शिंगोटे, ऋषिकेश वाकडे, अनंता राऊत, गौरव पवार आणि मीराताई हिरेकर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगोकार यांनी केले, तर आभार राहुल शिरसाट यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.