Akola News: सरकार शेतकरी प्रश्नांवर अजिबात संवेदनशील नाही. राज्यभरात अतिवृष्टीमुळे लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले. तरीही भरीव मदत जाहीर करण्याचे धाडस सरकारकडून होत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहत आहे. जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही, तर येणाऱ्या काळात रस्त्यावरची क्रांती सरकारला रोखता येणार नाही, असा इशारा शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी दिला. .मूर्तिजापूर तालुक्यातील गाजिपूर (टाकळी) येथे रविवारी (ता. ५) सायंकाळी आयोजित शेतकरी व शेतमजूर जागर सभेत बोलत होते. या सभास्थळी युवकांनी संघटनेचे नेते तुपकर यांच्याहस्ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. या वेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..Farmer Protest: ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन.श्री. तुपकर पुढे म्हणाले, की महिन्याभरात मोठे शेतकरी आंदोलन उभे राहणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या संघर्षात सहभागी व्हावे. असाच असंतोष वाढत राहिला तर नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिथे जसे मंत्री तुडवले गेले तसेच दृश्य आपल्या देशात पाहावे लागतील. असे मी अकोल्यात म्हटले होते, म्हणून माझा फोन आता टॅप केला जात आहे. पण मी घाबरणार नाही. .शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडताना तुपकर म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्ने होत नाहीत. याला जबाबदार ही व्यवस्था आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर दिवसेंदिवस खालावत आहे..Farmer Protest : रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण .शेतीमालाला योग्य दर मिळाला, तर मजुरांनाही योग्य मजुरी मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. त्यामुळे सोयाबीनला किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कापसाला १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाच पाहिजे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव अजून सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही..हे सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांबाबत असंवेदनशील आहे. २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे चार पट मोबदला देण्यात आला, त्याप्रमाणे चार पट नुकसानभरपाई आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आज दररोज ८ ते १० शेतकरी आत्महत्या करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.