
गडचिरोली : कृषिपंपांसाठी (Agricultural pumps) गेल्या चार वर्षांपासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना जोडणी मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ठाणेगाव टी-पॉइंटवर रास्ता रोको (Stop the way agitation) आंदोलन केले. या वेळी वीज वितरण कंपनीच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकरी संघर्ष समिती आरमोरीच्या नेतृत्वात हे आंदोलन (Agitation) करण्यात आले. वीज वितरण कंपनीकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणांवर भर दिला गेला आहे. व्यावसायिक व नगदी पिके (Crop) घेता यावी, यासाठी शेतकरी (Farmer) प्रयत्नशील आहेत. यासाठी पाण्याचे स्रोतही त्यांनी आपल्यास्तरावर निर्माण केले. परंतु पाण्याचा उपसा करण्यासाठी वीजजोडणी (Power connection) देण्यात महावितरण अपयशी ठरले आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) चार वर्षांपूर्वी नव्या वीज जोडणीसाठी पैसे भरले. डिमांड रक्कमेचा भरणा करून चार वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला. तरीही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे गेल्या चार वर्षांत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीमागे महावितरणचा (MSDEL) नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) एकरी ३५ हजार रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणी देखील या वेळी करण्यात आली.
ज्या भागात नव्या वीजजोडण्या आहेत. त्या भागात कृषिपंपांची (Agriculture Pump) वसुली कमी असल्याचे कारण दिले जाते.
वसुलीच्या १५ टक्के रक्कम कृषिपंपांच्या जोडण्यांवर खर्च करण्याचे धोरण आहे. परंतु वीज कंपनीचे कर्मचारी वसुलीच करीत नसल्याने नव्या वीज जोडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगाला वीजजोडणी देताना एक आणि शेतकऱ्यांना वीज (Farmer Electricity) जोडणीसाठी दुसरेच धोरण राबविण्याचे धोरण का रचण्यात आले, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी या वेळी केला.
दिलीप घोडाम, प्रहार संघटनेचे अध्यक्ष निखिल धार्मिक, अमोल मारकवार, वृंदा गजभिये, सुरेश चापले, अभिषेक चापले, राजू सातपुते, आदेश मुरांडे, राजेंद्र डोंगे, संजय लोथे, पिंटू बानबले, किशोर भोयर, चंद्रशेखर धंदरे यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.