Power Supply : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी रामेश्वर येथे ‘रास्ता रोको’

Farmer Protest : औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वरमध्ये दिवसभरात ३ ते ४ तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Rasta Roko Protest
Rasta Roko ProtestAgrowon
Published on
Updated on

Marathwada News : औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर येथील ‘महावितरण’च्या ३३ के. व्ही. केंद्रावरून २४ तासांपैकी दिवसभरात ३ ते ४ तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. ७) रामेश्वर (ता. औंढानागनाथ) येथील ३३ के. व्ही. केंद्रासमोर जिंतूर औंढा नागनाथ राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Rasta Roko Protest
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्तांना लवकरच मदत, ३ हजार कोटींचा प्रस्ताव तयार

औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर व साळणा येथील ३३ के. व्ही. केंद्राला जिंतूर येथून वीजपुरवठा केला जातो. परंतु मागील पंधरा दिवसांपासून २४ तासांपैकी दिवसभरात केवळ ३ ते ४ तास वीजपुरवठा केला जात आहे.

Rasta Roko Protest
Irrigation Department : चार प्रकल्पांतून फेब्रुवारीपर्यंत मिळणार पाणी

यामुळे रामेश्वर व साळणा परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले.

ज्ञानेश्वर झटे, राजू मुसळे, बबनराव इघारे, सुधाकर वैद्य, माऊली मगर आदीसह रामेश्वर, बेरुळा, उंडेगाव, केळी, पेरजाबाद, रुपुर हिवरखेडा, येळी, अनखळी, पोटा खुर्द, नांदखेडा, उखळी, लांडाळा, चिंचोली निळोबा, दौडगाव, पारडी, साळणा या गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. ‘रास्ता रोको’मुळे एक तास वाहतूक खोळंबली. औंढा तालुका ‘महावितरण’चे अभियंत्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com