Raigad Panisatha: यंदा भीषण दुष्काळाचे आणि जलसंकटाचे सावट श्रीवर्धन तालुक्यावर पसरले आहे. तालुक्यातील प्रमुख जलाशय असलेल्या रानवली धरणातील पाणीसाठा चिंताजनकरित्या घसरला आहे. रायगड पाटबंधारे विभाग (कोलाड) कडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबरअखेर रानवली धरणात केवळ ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लकराहिला आहे. .पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना धरणातील पाणीपातळी खालावल्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत..Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब.रानवली धरणाची संकल्पित उपयुक्त पाणीसाठा क्षमता २.२५४ दलघमी (दशलक्ष घनमीटर) आहे, मात्र २९ सप्टेंबरपर्यंत धरणामध्ये केवळ १.१६० दलघमी इतकाच उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत धरणात आजमितीला अवघा ५१ टक्केच साठा शिल्लक आहे..Raigad Dams: जलसाठ्याने जिल्ह्याला दिलासा.मागील आठवड्यात (ता. २४ सप्टेंबर) हा साठा ०.९४८ दलघमी इतका कमी होता. चालू मॉन्सून हंगामात रानवली धरण क्षेत्रात १९६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. .रानवली धणाच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने भविष्यात पाणीसंकटाची शक्यता वर्तवली जात आहे. परतीच्या पावसाआधीच धरणाची ही अवस्था असेल तर भविष्यात साठा किती राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.