‘पोकरा’ला प्रशासकीय गतिमानता पारितोषिक

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला (पोकरा) यंदाचे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियानाचे द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे.
POCRA
POCRAAgrowon

पुणे - कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला (पोकरा) (Award To POCRA) यंदाचे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियानाचे द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. रोख सहा लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

प्रशासकीय सेवांमध्ये गुणवत्ता, लोकाभिमुखता आणि निर्णयक्षमता आणणाऱ्या सरकारी आस्थापनांसाठी गेल्या वर्षीपासून गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेत राज्यस्तरीय गटात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला (Navinyata Society) दहा लाखाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

चार लाखांचे तृतीय पारितोषिक नाशिकच्या विभागीय आयुक्तालयाला मिळाले आहे. मोफत सातबारा वाटप व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी उभारी देणारे उपक्रम या कार्यालयाने राबविले आहेत. या शिवाय आधुनिक व्यवस्थापन, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली, जलपुनर्भरण, हरित इमारत असे उपक्रमदेखील या कार्यालयाने राबविले आहेत.

विभागीय गटात नगर पोलिस अधीक्षक कार्यालयाला ई-टपाल प्रणालीबद्दल दहा लाखांचे प्रथम, सुसज्ज रचनेबद्दल यवतमाळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सहा लाखांचे द्वितीय, तर नगरमधील राहता पंचायत समितीला नागरिकांच्या समस्यांच्या थेट निराकरण व इतर उपक्रमाबाबत चार लाखांचे तृतीय पारितोषिक मिळाले आहे. शासकीय कर्मचारी गटात पारोळा शहराचे तलाठी निशिकांत पाटील यांना ३० हजारांचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी स्वखर्चातून व लोकसहभागातून तलाठी कार्यालयाचे नूतनीकरण केले होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले प्रथम पारितोषिकाचे मानकरी

सर्वोत्कृष्ट कल्पना गटात तळोदा तहसील कार्यालय, नवापूर तहसील कार्यालय व अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला पारितोषिके मिळाली आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या गटात नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना प्रथम, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना द्वितीय, तर तृतीय पारितोषिक यवतमाळचे नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांना मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com