Rajarambapu Cooperative Bank Election : ‘राजारामबापू’ बँकेची निवडणूक बिनविरोध

Bank Election : आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती.
Rajarambapu Cooperative Bank Election
Rajarambapu Cooperative Bank ElectionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी (ता. २७) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ पैकी १९ अर्ज राहिले होते. ६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऊर्मिला राजमाने यांनी काम पाहिले. त्यांना सोमनाथ साळवी (इस्लामपूर), राजेंद्र पत्रीमठ (सांगली) यांनी सहकार्य केले.

बँकेचे नवनिर्वाचित संचालक :

सर्वसाधारण गट : प्रा. शामराव ज्ञानदेव पाटील (इस्लामपूर), संजय जयसिंग पाटील (नेर्ले), माणिक शामराव पाटील (बोरगाव), विजय विठ्ठलराव यादव (बावची), डॉ. प्रकाश हिंदुराव पाटील (येडेनिपाणी), जयकर बाबूराव गावडे (वाळवा), धनाजी आनंदराव पाटील (जुनेखेड), अनिल हणमंत गायकवाड (मिरजवाडी), नामदेव तुकाराम मोहिते (महादेववाडी), संभाजी पाटील (मालेवाडी), प्रशांत पाटील (वशी), अशोक पाटील (ऐतवडे खुर्द), राजेश पाटील (कापूसखेड), सुरेश पाटील (ढवळी).

Rajarambapu Cooperative Bank Election
Jalna District Bank Election : जालना जिल्हा बॅंक बिनविरोधसाठी हालचाली

महिला राखीव गट - सुस्मिता सुरेश जाधव (नरसिंहपूर), कमल राजेंद्र पाटील (इस्लामपूर).

इतर मागासवर्गीय - शहाजी संभाजी माळी (कासेगाव).

अनुसूचित जाती-जमाती - सुभाषराव यशवंत सूर्यवंशी (इस्लामपूर).

भटक्या-विमुक्त जाती - आनंदा पिराजी लकेसर (दुधारी).

सहा नवे चेहरे

सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रदेश सदस्या कमल पाटील, कासेगावचे शहाजी माळी, ऐतवडे खुर्दचे अशोक पाटील, ढवळीचे सुरेश पाटील, कापूसखेडचे राजेश पाटील या ६ नव्या चेहऱ्यांना संचालक मंडळात संधी देण्यात आली आहे.

३८१० कोटींची बँक

राजारामबापू बँकेने गेल्या ४२ वर्षांत पारदर्शी आणि काटकसरीचा कारभार करीत राज्यात नावलौकिक मिळविला आहे. बँकेकडे २२७० कोटींच्या ठेवी असून १५५० कोटींची कर्जे दिली आहेत. एकूण व्यवसाय ३८२० कोटींचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com