Sangali News: यंदाचा बेदाणा हंगाम सुरू झाला असला तरी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बेदाणा निर्मिती प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. बेदाणा तयार होण्यास साधारण पाच ते सहा दिवसांचा विलंब होत आहे. त्यामुळे उत्पादकांचे नियोजन कोलमडले आहे. प्रति किलोस ३ ते ४ रुपयांचा अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत..जिल्ह्यात यंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला आहे. साधारण पंधरा ते वीस दिवसांपासून हंगामाला गती आली आहे. सांगली जिल्ह्यात जवळपास एक हजाराहून अधिक शेडवर बेदाणा तयार होवू लागला आहे. बेदाणा उत्पादक शेतकरी बेदाणा शेडवर ठाण मांडून बसला आहे. बेदाणा तयार झाला की त्याची विक्री करण्याचे नियोजनही शेडवर करू लागला असल्याचे चित्र आहे. प्रत्येक शेडवर कमी अधिक प्रमाणात बेदाणा तयार होऊ लागला आहे..Illegal Raisin Import: राज्यात बेकायदा बेदाणा आयात करणाऱ्यांवर गुन्हे.वास्तविक पाहता, हंगाम सुरू झाल्यापासून दररोज सकाळी थंडी, दुपारी ऊन तर सायंकाळी गारवा असे वातावरण आहे. आर्द्रताही जास्त आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम बेदाणा तयार होण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. बेदाणा तयार होण्यासाठी सरासरी १० ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु या वातावरणामुळे सहा ते सात दिवसांचा अतिरिक्त म्हणजे १६ ते २० दिवसांत बेदाणा तयार होत आहे..गतवर्षी बेदाणा तयार होण्यासाठी प्रति किलोमागे सरासरी ३० रुपये इतका खर्च येतो. यंदा बेदाणा तयार करण्यासाठी गंधक आणि कार्बोनेट हे लागते. परंतु याचेही दर वाढले आहेत. त्यातच या बदलत्या वातावरणाचा मुळे बेदाणा तयार करण्यासाठी अंदाजे प्रति किलोस ३ ते ४ रुपयांचा खर्च वाढला असून, सद्यःस्थितीला ३३ ते ३४ रुपयात एक किलो बेदाणा तयार होत आहे..Illegal Raisin Import: आयात बेदाण्यामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादकांचे नुकसान; अधिवेशनात सरकारकडून बैठकीचे आश्वासन.बेदाणा निर्मितीचा हंगाम सर्वसाधारपणे तीन महिने चालतो. मात्र गतवर्षी जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. फळ छाटणीच्या काळातही पाऊस पडला. यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने याचा फटका बेदाणा निर्मितीलाही झाला आहे. परिणामी, यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम दोन महिनेच चालेल, अर्थात एक महिना बेदाणा हंगाम अगोदर संपेल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..वातावरणात थोडा बदल झाला असल्याचे जावणत आहे. त्यामुळे येत्या दोन ते दिवसांत बेदाण्याला पोषक वातावरण मिळेल, असा अंदाज आहे.- सुनील माळी, शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ.आमच्या भागात यंदा बेदाणा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. परंतु बेदाणा निर्मितीस फारशी गती आली नाही. मार्चच्या मध्यापासून गती येईल.- महादेव भोसले, उमदी, ता. जत, जि. सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.