Maharashtra Rain : माहूर, बिलोली, हदगाव तालुक्यांत पाऊस कमीच

Rain Update : जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या माहूर तालुक्यात सर्वात कमी ५६.५३ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस मुखेड, धर्माबाद, मुदखेड, लोहा, कंधार या तालुक्यांत झाला आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जूनमध्ये दरवर्षी दमदार हजेरी लावणारा पाऊस याही वर्षी जूनमध्ये पडणाऱ्‍या पावसाच्या तुलनेत ९६ टक्के झाला आहे. मात्र, या पावसाचे प्रमाण माहूर, बिलोली, हदगाव, देगलूर व नायगाव तालुक्यांत कमी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या माहूर तालुक्यात सर्वात कमी ५६.५३ टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस मुखेड, धर्माबाद, मुदखेड, लोहा, कंधार या तालुक्यांत झाला आहे.

Rain
Monsoon Rain : जुलैमध्ये तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहणार? जुलै महिन्यात राज्यातील जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण कसे राहणार ?

मराठवाड्यात नांदेड जिल्हा हमखास पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८९१.३० मिलिमीटर पावसाची नोंद होते. यात सर्वाधिक पाऊस जंगल भाग असलेल्या माहूर तालुक्यात १०१६.७० मिलिमीटर व किनवट तालुक्यात १०२६.५८ मिलिमीटर पडतो.

Rain
Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

दरम्यान, चालूवर्षी भारतीय हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. यानुसार जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचे आगमन झाले. परंतु काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागात पेरण्यांची कामे पूर्ण होत आली आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कळविले आहे.

जूनमधील पाऊस स्थिती (मिमी)

तालुका पडणारा पाऊस पडलेला पाऊस टक्के

नांदेड १४५.७० १४८.५० १०२

बिलोली १५८.२० १२७.४० ६६

मुखेड १३२.०० २०१.८० १५२

कंधार १४८.२० १५९.६० १०८

लोहा १३१.९० १६८.६० १२८

हदगाव १७६.१० १३६.०० ७७

भोकर १८४.६० १७८.८० ९७

देगलूर १४५.३० १२८.३० ८८

किनवट १९९.१० २०२.०२ १०१

मुदखेड १२९.५० १५८.२० १२२

हिमायतनगर १६८ १६३.४० ९७

माहूर २५०.१० १४२.५० ५६

धर्माबाद १५५.४० १५४.०० ९९

उमरी १४०.०० १३९.४० ९९

अर्धापूर ११९.१० १७९.५० १५०

नायगाव ८५.३० ७३.५० ८६

एकूण १६३.३० १५७.७० ९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com