Farmer Faces Challenges: पावसाचा फटका यंदा खरीप हंगामातील मका पेरणीला बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात मका पेरणीत ८,६४४ हेक्टरने घट झाली. यंदा ७९,४७८ हेक्टरवर मका पेरणी झाली. हे क्षेत्र जिल्ह्याच्या खरिपातील सरासरी ४७,८६१ हेक्टरच्या तुलनेत १६६ टक्के आहे. गतवर्षी ८८,१२२ हेक्टरवर पेरणी झाली होती..ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरिपातील पिकांवर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी पिके करपू लागल्याने मक्याच्या पेरणीला मर्यादा आल्या. जिल्ह्यात शेतकरी मक्याची लागवड धान्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्यासाठीही मोठ्या प्रमाणावर करतात..Maize Market: देशात मका वापर वाढण्याचा अंदाज.त्यामुळे यंदा चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी यंदा मक्याची पेरणीही लांबली. सप्टेंबरमध्येही पुरेसा पाऊस न झाल्यास उभ्या पिकांना फटका बसून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुढील रब्बी हंगामावरही होऊ शकतो..Maize Farming: मका पिकात ओळख मिळवतेय गाव शेलवड.दरम्यान, गेल्या काही महिन्यांत मक्याच्या दरात सुधारणा झाली आहे. सोलापूरसह राज्यात मक्याचा सरासरी दर सध्या २,३०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास, तर प्लांटचा दर सुमारे २,५०० रुपये आहे. आगामी उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने मक्याची उपलब्धता व निर्यातीवरही परिणामाची शक्यता आहे..पाच वर्षांतील मका पेरणी (हेक्टरमध्ये)२०२२ ६०,४१५२०२३ ५७,०८७२०२४ ८६,७८९२०२५ ८८,१२२२०२६ ७९,४७८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.