Agriculture Issues : पांगरी जि सोलापूर बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी व परिसरात पावसाने सलग तीन महिने दडी मारल्याने खरिपाचे मुख्य पीक असलेले सोयाबीन पूर्णपणे धोक्यात आले आहे. शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरच जमिनीतील ओलावा संपल्याने सोयाबीनची पिके पाण्याअभावी जळून करपू लागली आहेत. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे..पावसाअभावी शेतांना मोठ्या भेगा पडल्या असून माळरानावरील हलक्या जमिनीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. .El Nino Challenges: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हाने.यातच सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. मात्र, पाणीच उपलब्ध नसल्याने औषध फवारणीचा खर्च निरर्थक ठरत असल्याने शेतकऱ्यांनी फवारणीही थांबवली आहे..Soybean Crop Damage: पावसाची दडी, धाराशिवमध्ये सोयाबीनचं उभं पीक वाळलं, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज.दुसऱ्या बाजूला, विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने खरीप कांद्याची रोपे तयार असूनही लागवड पूर्णपणे खोळंबली आहे. सलग दोन हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे..पावसाने मारलेली दडी आणि सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा.-किरण मुळे, शेतकरी, उक्कडगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.