Rain Update : खानदेशात पावसाची विश्रांती

Rain News : खानदेशात सोमवारी (ता. २९) सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. अपवाद वगळता पाऊस नव्हता.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सोमवारी (ता. २९) सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. अपवाद वगळता पाऊस नव्हता. यात जूननंतर या महिन्यातही खानदेशात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.

काही भागांत हलका किंवा भिज स्वरूपाचा तर काही भागात मध्यम पाऊस झाला. अतिजोरदार किंवा जोरदार पाऊस अनेक भागांत नसल्याने सिंचन प्रकल्पांतील जलसाठा फारसा वाढलेला नाही. परंतु भिज पावसाने पाऊसमानाची टक्केवारी वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यात काही भागांत तळोदा, शहादा, अक्कलकुवा आदी क्षेत्रातील सिंचन प्रकल्प भरले आहेत.

Rain Update
Rain Update : नांदेडमधील सर्वच तालुक्यांत भीज पाऊस

खानदेशात मागील १५ दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. पावसाची संततधार सुरूच होती. अनेक भागात पिके पाण्याखाली गेली. परंतु मंगळवारी (ता. ३०) पाऊस थांबल्याची स्थिती होती. जूनमध्ये खानदेशात जळगाव जिल्ह्यात रावेर भागात पावसाची तूट होती. ही तूट जुलैत भरून निघाली. जुलैमध्ये सुरुवातीला नंदुरबारमध्ये पावसाची तूट होती. परंतु नंदुरबारमध्येही पावसाची संततधार सुरू झाल्याने ही तूट दूर झाली.

जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये १३६ टक्के पाऊस झाला. तर जुलैतही ११५ टक्के पाऊस झाला. धुळ्यातही जून व जुलैत सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. नंदुरबारातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस जुलैत झाला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ६३२ मिलिमीटर पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत होतो. यातील ३७० मिलिमीटर पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला असून, एकूण ५८ टक्के पाऊस सोमवारअखेर झाला आहे.

Rain Update
Rain update: आज गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

धुळ्यात एकूण ५४५ मिलिमीटर पाऊस होत असतो. यातील ५५ टक्के पाऊस धुळ्यात झाला आहे. तर नंदुरबारचे पाऊसमान ८३२ मिलिमीटर असून, यातील ५० टक्के पाऊस नंदुरबारमध्ये झाल्याची माहिती मिळाली. जूनमध्ये जळगाव जिल्ह्यात एकूण १२३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. १६९ मिलिमीटर पाऊस जूनमध्ये जिल्ह्यात झाला होता. तर जुलैमध्ये एकूण १८९ मिलिमीटर पाऊस होतो. या तुलनेत २०१ मिमी पाऊस जुलैमध्ये झाला.

धरणगाव, रावेरमध्ये कमी पाऊस

जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये रावेरमध्ये कमी पाऊस होता. या महिन्यातही रावेरमध्ये कमी पाऊस झाला असून, जुलैमधील सरासरीच्या तुलनेत रावेरात ८९ टक्के पाऊस झाला. तर धरणगाव तालुक्यातही ९६ टक्के पाऊस झाला आहे. धरणगाव तालुक्यात २८ जुलैपर्यंत ३५२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता.

या तुलनेत धरणगावात ३३८ मिलिमीटर पाऊस झाला. रावेरमध्ये २८ जुलैपर्यंत २९६ मिलिमीटर पाऊस होत असतो. परंतु यंदा २८ जुलैपर्यंत रावेरमध्ये २६६ मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात अन्य तालुक्यांत मात्र जुलैमधील सरासरी पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला. जळगाव तालुक्यात सर्वाधिक १४५ टक्के पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com