Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील बहुतांश भागात पावसाचे कमी अधिक बरसने सुरूच आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत बीड जिल्ह्यातील काही तालुके व जालना, छत्रपती संभाजीनगरमधील काही मंडले वगळता अनेक भागांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली..बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, वडवणी, धारूर, केज हे तालुके वगळता बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई या तालुक्यांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. आष्टी तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. या तालुक्यात सरासरी १७.६ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यात सरासरी ९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Cotton Crop Loss: परभणीत दोन लाख हेक्टरवरील कपाशीला फटका.जिल्ह्यातील मंठा तालुक्यात सरासरी १७.७ मिलिमीटर, घनसावंगीमध्ये १०.५ मिलिमीटर, बदनापूरमध्ये ६.९ मिलिमीटर, परतुरमध्ये ४.६ मिलिमीटरमध्ये, १३.२ मिलिमीटर, जालनात १६.३ मिलिमीटर, जाफराबादमध्ये २.३ मिलिमीटर, भोकरदनमध्ये सरासरी ६.६ मिलिमीटर पाऊस झाला. मंठा, जालना, अंबड तालुक्यांत पावसाचा जोर थोडा अधिक होता..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात सरासरी १६.७ मिलिमीटर, सोयगाव ४.३ मिलिमीटर, सिल्लोड १२.७ मिलिमीटर, खुलताबाद १९.५ मिलिमीटर, कन्नड ६.९ मिलिमीटर,वैजापूर १२.२ मिलिमीटर, गंगापूर १५.५ मिलिमीटर, पैठण १०.७ मिलिमीटर तर छत्रपती संभाजी तालुक्यात सरासरी १४.४ मिलिमीटर पाऊस झाला..Kharif Crop Loss: खरिपाची कसर रब्बीत भरून काढू!.जिल्हानिहाय पावसाची मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर ः करमाड २२.३, लाडसावंगी ३५.८, शेकटा ३५.८, लोहगाव २०.३, मांजरी २३.८, शेंदूरवादा २६.५, तुर्काबाद २४.८, खंडाळा २१.५, शिऊर २५.८, बोरसर २५.८, वेरूळ ३०, बाबरा २६.३.जालना ः वाघरूळ २४.३,विरेगाव २६, मंठा २४.८,पांगरी गोसावी २२.८. बीड ः धामणगाव २५.३, दौलावडगाव २७, धानोरा २५.३..अवकाळी पावसाने कपाशीचे प्रचंड नुकसानबिडकीन : पैठण तालुक्यासह बिडकीन परिसरात रविवारी (ता. २६) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशी पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. .२१ तारखेपासून सतत पाऊस पडतो आहे. आधीच पेरणी लांबणीवर पडली त्यात पडणाऱ्या पावसाने खोडा घातला. आमच्या शिवारात फुटलेला कापूस भिजला, नुकसान सुरूच आहे.- ज्ञानेश्वर जाधव, जामखेड, ता. अंबड, जि. जालना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.