Monsoon Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५८ मंडलांत पाऊस

Rain Update : सोमवारी (ता. १०) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ५८ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस पाऊस झाला.
Agriculture
AgricultureAgrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांची पेरणी सुरू झाली नाही. परंतु पाऊस पडेल या आशेने तसेच संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे.

Agriculture
Monsoon Update : मॉन्सून संभाजीनगरपर्यंत

दरम्यान, सोमवारी (ता. १०) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ५८ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ४५ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

Agriculture
Agriculture Update : खते, बियाण्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९.४ मिमी तर १ जूनपासून आजवर सरासरी ४५.४ मिमी पाऊस झाला. हिंगोलीतील १३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १.५ मिमी तर १ जूनपासून आजवर सरासरी २९.६ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः पेडगाव १६.८, झरी ५.५, टाकळी कुंभकर्ण ८, बामणी १२.८, चारठाणा ५.३, वाघीधानोरा ६४.३, सेलू ५.५, देऊळगाव गात १६.८, वालूर १३.३, कुपटा ७.८, चिकलठाणा ६, मोरेगाव १६, पाथरी २०.८, सोनपेठ ९, शेळगाव ११.५, बाभळगाव १३.८, हादगाव २६.८, कासापुरी २१.८, गंगाखेड १३, पालम १२.३, पूर्णा ९, ताडकळस ६.३, चुडावा २२.८. हिंगोली जिल्हा ः वाकोडी ७.५, नांदापूर ९, साखरा १२.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com