

Parbhani Rain News : यंदा पावसाळ्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ५२ मंडलांमध्ये रविवारी (ता.२५) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातील ४० मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३.६ मिलिमीटर, जून महिन्यात आजवर सरासरी २५.८ मिलिमीटर पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातील २२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील काही मंडलांत पावसाचा अधिक जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.९ मिलिमीटर, तर जून महिन्यात आजवर सरासरी २७.७ मिलिमीटर पाऊस झाला.
मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
परभणी जिल्हा - टाकळळी कुंभकर्ण १४.५, बोरी ५.५, चारठाणा ९.५, देऊळगाव ८.३, चिकलठाणा १६.५, गंगाखेड ४५.३, माखणी १३.३, पिंपळदरी ६.३, पालम ५.८, चाटोरी १७.५.
हिंगोली जिल्हा - हिंगोली २०.५, नरसी १५, डिग्रस ४७.८, माळहिवरा १७.८, खंबाळा ९.५, कळमनुरी ५.३, औंढा नागनाथ ९, येळेगाव ६.८, सेनगाव ५०.३, गोरेगाव २२, आजेगाव २२, पानकनेरगाव ९, हत्ता ८.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.