Soybean Crop Damage : अमरावती जिल्ह्यात पावसाने तीस टक्के सोयाबीन हातचे गेले

Heavy Rain Crop Loss : सोयाबीन सोंगणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील एकूण पेरणीक्षेत्रातील तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रास फटका बसला आहे.
Soybean Crop Damage
Soybean Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Amravati News : सोयाबीन सोंगणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील एकूण पेरणीक्षेत्रातील तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रास फटका बसला आहे. बाजारात नवीन सोयाबीनला हमीदर मिळत नसताना पावसाने केलेल्या आक्रमणाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

जिल्ह्यात २ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी यंदाच्या खरीप हंगामात झाली आहे. मॉन्सून उशिराने आल्याने पेरणी विलंबाने झाल्या होत्या. काही भागात अरली सोयाबीनची पेरणी झाली होती. जुलै व ऑगस्टमधील सततच्या पावसाने जमिनीतील ओलावा कायम राहिल्याने सोंगणी केलेल्या सोयाबीनमध्ये आर्द्रता आहे. परिणामी बाजारात या सोयाबीनचे दर कमालीचे घसरले आहेत.

Soybean Crop Damage
Soybean Crop Damage : परतीच्या पावसाने शेतात सोयाबीनचा चिखल

तर नंतर पेरणी झालेल्या सोयाबीनची सोंगणी शेतकऱ्यांनी दसऱ्यापासून प्रारंभ केली आहे. सोंगणी सुरू असतानाच शनिवारी (ता. १९) उत्तररात्री पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. जवळपास ३३ मिमी पाऊस बरसला. त्यानंतरही दिवसाही हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसल्याने सोंगणी केलेला सोयाबीन सुरक्षितस्थळी नेण्यापूर्वीच ओला झाला. तर सोंगणी न झालेल्या उभ्या सोयाबीनवर पावसाचा कहर बरसला. शेंगा भिजून दाणे ओले झाल्याने ते सुकवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या पावसाने दाणे काळे पडण्याची शक्यता असल्याने भाव मिळवताना अडचणी जाणार आहेत.

Soybean Crop Damage
Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

एकूण पेरणी क्षेत्रापैकी १९ हजार ७३ हेक्टरवर आधीच यलो मोझॅकने हल्ला केला होता. २६१० हेक्टरमधील पिकांवर पांढरी माशी तर ९६४ हेक्टरमधे मुरकूज रोग आला होता. ५३८८ हेक्टरमधील सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. २८ हजार हेक्टरमधील सोयाबीन हाती येण्यापूर्वीच वाया गेले असताना गेल्या दोन दिवसांतील सोयाबीनवर पावसाने आक्रमण केल्याने खराब होण्याची शक्यता वाढली आहे. सुमारे तीस टक्के क्षेत्रातील सोयाबीन या पावसाने धोक्यात असल्याचे कृषितज्ज्ञानी म्हटले आहे.

सरासरी घटण्याची चिंता

जुलै व ऑगस्टमधील सततच्या पावसाने आधीच फटका बसला असल्याने सरासरीत घट आली आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांना एकरी दीड ते दोन क्विंटलची सरासरी येत असल्याचे सांगितले. कृषी विभागाने यंदा चार ते पाच क्विंटलची सरासरी वर्तविली होती. त्यामध्ये घट येणार असल्याचे चित्र सध्या आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com