Kolhapur News : जिल्ह्यात रविवारी (ता. १) पावसाची संततधार सुरूच राहिली. जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. राधानगरी धरणातून ४०० क्युसेक आणि काळम्मावाडी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यातील इचलकरंजी हा एकच बंधारा पाण्याखाली गेला आहे. सोमवारी (ता. २) दिवसभर ढगाळ वातावरण होते.
पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाने जलाशयात पाण्याची आवक वाढल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा २४ टीएमसीवर पोहोचला आहे. धरण भरण्यासाठी एक टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा होणे बाकी आहे. दरम्यान, धरणातून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
पायथ्या वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी १२०० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. धरण रविवारी सायंकाळी ९६.३२ टक्के भरले. धरणात २४.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण ६४६ मीटर पाणीपातळी झाली की पूर्ण भरते. रविवारी सायंकाळी पाणी पातळी ६४५.२२ मीटरपर्यंत पोहोचली आहे.
धामोड येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. येथे १२ तासांत १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग धरण क्षेत्रात येत असून, सध्या तुळशी धरण ८७ टक्के भरले आहे.
रविवारी सकाळपासून पावसाचा जोर तुळशी धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात वाढला आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा ३४७१ दलघफू झाला आहे. धरणक्षेत्रात आजअखेर एकूण २७३७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.कूण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू केला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या चांदोली (वारणा) धरण प्रशासनाने धरणातून विसर्ग वाढवला असून, वारणा नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोली धरण शंभर टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची अतिवृष्टी सुरू आहे. आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणाच्या वक्राकार दरवाजांद्वारे ५००० क्युसेक, वीजनिर्मिती केंद्रातून १४०० असा ए
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.