Pune News: स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या दुसऱ्या दिवशी होऊ घातलेल्या तिसऱ्या मुंबईसाठी रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली. या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले..दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २१) युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्यूचर्स कलेक्टिव्ह -लंडन, आयसीसीआय-इटली, अँलाँग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजीयन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुराँग -सिंगापूर यांच्यासोबत महाराष्ट्र सरकारने तांत्रिक करार केले. यातून एक प्रकारे केवळ गुंतवणूक नाही, तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्यारीतीने काम करता येईल. शहरी विकास आराखडा, वाहतुकीशी संबंधित करारांमुळे प्रत्येक शहरातील पायाभूत सुविधांची सरंचना चांगल्या रीतीने करता येणार आहे..Davos Investment: दावोसमध्ये पहिल्या दिवशी १४ लाख कोटींवर करार.नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर पेण येथे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले..या ठिकाणी ‘प्लग ॲण्ड प्ले’ या धर्तीवर ‘रेडी टू स्टार्ट’ पद्धतीने संबंधित घटक लगेच कामकाज सुरू करू शकणार आहेत. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. यात शासन, एमएमआरडीए आणि खासगी घटक एकत्र येऊन काम करतील. या ठिकाणी नवीन व्यापारी जिल्हा तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तसेच ग्लोबल कॅपिसिटी सेंटर्स, फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल. ‘बीकेसी’च्या धर्तीवर याठिकाणी व्यापारी जिल्हा स्थापन होईल. या शहराच्या घोषणेनंतर सुमारे एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील झाले आहेत..India GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्के दराने वाढेल, 'ट्रम्प टॅरिफ'चा परिणाम संपुष्टात, 'आयएमएफ'चा अंदाज काय सांगतो?.यासाठी जगातील दिग्गज कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप, स्वित्झर्लंडमधून एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स हे अमेरिकेतील समूह, फिनलंडचा रिव्हर रिसायकल समूह, दुबईचा एमजीएसए समूह, सिंगापूरचा स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स या विदेशी गुंतवणुकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल. या ठिकाणी ‘वॉक टू वर्क’ अशा पद्धतीने सुविधा निर्माण होतील. अशा रीतीने नवे शहर प्रत्यक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केले..दावोस दौऱ्यातून ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळविता येते. त्याचा देशाला आणि पर्यायाने राज्याला मोठा फायदा होतो. यंदा नागरी क्षेत्रातील नियोजन आणि परिवहन व्यवस्थेच्या दृष्टीने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्याशी संवाद, समन्वय साधता आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले..जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांच्याशी चर्चामुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रिअल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊ शकते. यातून ‘एमएसएमई’ क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण तसेच निर्यात क्षमतेला मोठा वाव मिळणार आहे. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.