Migrant Workers: मासेमारीचा हंगाम १५ ऑगस्टपासून सुरू झाला असला तरी समुद्र अद्याप खवळलेला असल्याने मच्छीमार समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, मासेमारीसाठी गावाकडे गेलेले परराज्यातील कामगार रायगडमधील विविध बंदरांवर परतू लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आगामी काही दिवसांत जवळपास १२ हजार पुरुष कामगार जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तसेच मासळीची वर्गवारी, सुकविणे आदी कामांसाठी सुमारे तीन हजार महिला कामगार येणार असल्याने रायगडच्या बंदरांमध्ये पुन्हा लगबग वाढू लागली आहे..मासेमारीच्या हंगामामुळे तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर बंदरांमध्ये वर्दळ वाढत आहे. अनेक कामगार दरवर्षी कोकणातील बंदरांवर येत असल्याने त्यांची कामाची होडी आणि मालक ठरलेले असतात. त्यामुळे जुन्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची प्रक्रिया सोपी असते, मात्र यंदा नव्याने येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असल्याने मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांच्या ओळखीसह कागदपत्रांच्या पडताळणीवर विशेष भर दिला आहे..Water Conservation: साठलेल्या पाण्यावर फळबागांतून समृद्धीकडे.नव्या कामगारांची कागदपत्रे अनिवार्यनव्याने येणाऱ्या कामगारांना कामावर घेण्यापूर्वी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, छायाचित्र तसेच संबंधित गावातील रहिवासी दाखला आदी कागदपत्रांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग आणि संबंधित मच्छीमारी संस्थांकडे जमा करावी लागणार आहे..Rangeland Restoration: माळरानांच्या पुनर्स्थापनेची गरज व दिशा .सागरी सुरक्षेला प्राधान्यसागरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या बोटीवरून किती मच्छीमार समुद्रात गेले आहेत, याची दररोज माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नव्या कामगारांची कागदपत्रे आणि बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत..त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांचा मागोवा घेणेही प्रशासनाला शक्य होणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी ही माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.