Kharif Crop Planning: रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना शेतकरी मात्र अद्याप बियाण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठी मोफत अथवा अनुदानित स्वरूपात १६ हजार ९५० टन बियाण्यांचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे. मे महिना संपत आला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बियाणे उपलब्ध झालेले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुळवाफे पेरणीला सुरुवात होते. पावसाच्या आगमनापूर्वी शेतकरी बियाणे, खते आणि शेतीची मशागत यांची तयारी करून ठेवतात. यंदाही मॉन्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. .kharif Season Seed : बियाण्याची उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती.त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले असले, तरी बियाण्यांचा पुरवठा रखडल्याने नियोजन कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत माहिती देताना रायगड कृषी विभागाचे उपसंचालक प्रवीण तिगडे यांनी सांगितले की, पोर्टलमधील नोंदणी येत्या आठवडाभरात सुरू होईल, त्याचबरोबर १८८ परवानाधारक दुकानदारांपैकी जास्तीत जास्त दुकानदारांकडे बियाणी उपलब्ध होतील..Kharif Seed Supply: गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा वेळेत पुरवठा करा.अनुदानावर संभ्रमअनुदानित बियाणे मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यंदा या पोर्टलवर भात बियाण्यांचा समावेश पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे. .मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना अर्ज पूर्ण करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.