Farmers Protest: राज्य सरकार उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील तब्बल १२४ गावांतील जमिनी या एमएमआरडीच्या माध्यमातून संपादन करून तिसरी मुंबई निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला १२४ गावांतील जनतेचा तीव्र विरोध सुरू झाला असून, त्याबाबत भूसंपादनविरोधी शेतकरी समितीने गावागावात जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता. २३) चिरनेर येथे झालेल्या बैठकीत भूसंपादनाविरोधात आरपारची लढाई करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला..एक तर राज्यात परप्रांतीयांचा लोंढा वाढत असताना राज्य सरकारने मुंबई, नवी मुंबईनंतर तिसरी मुंबई निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी स्थानिकांच्या जमिनी संपादन करून त्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सुरू असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Land Acquisition Protest: पुरंदर विमानतळ भूसंपादनाला विरोध.राज्य सरकारने या जमिनी संपादन करण्याची जबाबदारी एमएमआरडीएच्या खांद्यावर दिली आहे. दुसरीकडे आपल्या हक्काची जमीन कायमची हातून जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. शेतकऱ्यांवरील या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी भूसंपादनविरोधी शेतकरी संघर्ष समिती सज्ज झाली असून, त्यांच्या वतीने गावागावात जाऊन समाजप्रबोधन करण्यात येत आहे. .Land Acquisition Protest: रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास विरोध.या प्रकल्पाची १२४ गावांतील शेतकऱ्यांना कल्पना नसल्याने त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ही समिती करीत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादन करून शेतकऱ्यांना फक्त २२.५ टक्के भूखंड देण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक आहे. विकासाला आमचा विरोध नाही, तर सरकारच्या तानाशाहीला आमचा कायम विरोध राहणार आहे. .शासनाला जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर शासनाने २०१३चा भूसंपादन कायदा लागू करावा तसेच शासनाने शेतकऱ्यांवर तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प लादला तर त्याला रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू असा इशारा भूसंपादनविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.