Fertilizer Stock Raid : तीर्थपुरीत खतसदृश साठ्यावर छापा

Fertilizer Jalna Update : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शहागड रस्त्यावरील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे खतसदृश साठ्यावर पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी (ता. १९) छापा टाकला.
Fertilizer Stock Raid
Fertilizer Stock RaidAgrowon
Published on
Updated on

Jalna Fertilizer News : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शहागड रस्त्यावरील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे खतसदृश साठ्यावर पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी (ता. १९) छापा टाकला.

रात्री उशिरापर्यंत कारवाईत मोठ्या प्रमाणात खतसदृश साठा आढळून आला. याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fertilizer Stock Raid
Fertilizer, Seed Selling : पाऊस लांबल्याने बियाणे, खते विक्रीवर परिणाम

यासंदर्भातील माहितीनुसार, गोडाउनमध्ये खत सदृश साठा आणून तो नामांकित कंपन्यांच्या पिशवीत भरून विकल्या जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणावर पाळत ठेवली होती.

सोमवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील साठ्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये जवळपास ८५६ गोण्यांत खतसदृश साठा आढळून आला. याशिवाय नामांकित कंपनीच्या न वापरलेल्या व फोडून वापरलेल्या मिळून ४ हजारांपेक्षा जास्त रिकाम्या गोण्या आढळून आल्या.

या प्रकरणात जालन्याचे मोहीम अधिकारी निलेश भदाणे यांनी साई इंटरप्राइजेस अँड ॲग्रो शहागड रोड तीर्थपुरी या कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे गणेश बोबडे यांच्याविरुद्ध रीतसर फिर्याद दिली. पुढील तपास गोंदी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सानप करीत आहेत.

खतसदृश साठ्याचे नमुने घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती या प्रकरणातील फिर्यादी खत निरीक्षक तथा मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जालना श्री. भदाणे यांनी दिली.

या संपूर्ण छापा प्रकरणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जालना जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी एस. व्ही. कराड, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) आशिष काळुसे, जिल्हा कृषी अधिकारी विशाल गायकवाड आदींनीही सहभाग नोंदविल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com