Parliament Debate: ‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत येऊन विद्यार्थ्यांवरील कथित हिंसाचाराचे स्पष्टीकरण देण्यास इतके घाबरत का आहेत? त्यांची अनुपस्थितीच ते दोषी असल्याची निदर्शक आहे,’’ असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. ३०) केला. विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस अत्याचारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, या मागणीचाही त्यांनी व विरोधकांनी पुनरुच्चार केला..राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीमार होत असल्याचा एक व्हिडिओ शेअर करत, ‘‘विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्यावरील अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय स्वतंत्र समिती स्थापन करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली..Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी.यापूर्वी बुधवारीही गांधी यांनी शहा यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची आणि विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस अत्याचार तसेच आंदोलकांवर पेलेट गन वापरल्याच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचे आदेश शहा यांनी दिले असतील तर ते जबाबदार आहेत आणि तसे नसल्यास ते अकार्यक्षम ठरतात, असा दावाही त्यांनी केला होता. .Rahul Gandhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधींसह खासदारांचे आंदोलन; पंतप्रधान मोदी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.दरम्यान, भाजपने राहुल गांधी यांच्या आरोपांचे खंडन करत, त्यांनी लोकसभेत बिनबुडाचे आरोप करून सभागृहाचा गैरवापर केला असून त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली..पेपरफुटी प्रकरणांत कठोर शिक्षेच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान गांधी यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलिस कारवाईमागे शहा असल्याचा आरोप लोकसभेत केला होता. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गांधी यांच्या भाषणातील काही विधाने कामकाजातून वगळली; मात्र त्यानंतरही संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना गांधी आपल्या आरोपांसंदर्भात ठाम राहिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.