Congress Three Demands: दिल्लीत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा मुद्दा उचलून धरत काँग्रेसने त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन उत्तर द्यावे आणि त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशा तीन मागण्या काँग्रेसने केल्या आहेत..लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पत्रकार परिषद घेत या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत..गृह मंत्रालयाकडून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवण्याच्या आणि खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे संपूर्ण देशाने पाहिले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले होते का? यावर त्यांनी संसदेत उतर द्यावे. ते दोषी असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमची मागणी असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. .Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने....मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आमची पहिली मागणी ही आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या क्रूर कारवाईबद्दल उत्तर द्यायला हवे..Ranchi Student Protest: झारखंड संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी रांचीमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन; पोलिसांकडून पाण्याचा मारा.विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला. अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या, गॅस, पाण्याचे फवारे सोडले. इलेट्रिकल काठीने मारहाण केली. या पार्श्वभूमीवर पेपरफुटी प्रकरणावर चर्चेची आमची मागणी होती. पण यावर १४- १५ दिवस सरकारने मौन बाळगले. अमित शहा संसदेत आले नाहीत..देशाचे भविष्य असलेल्या तरुणांवर अशी अमानुष कारवाई का केली? यासाठी जबाबदार कोण आहे? आम्ही या गंभीर विषयावर चर्चेची आणि गृहमंत्र्यांच्या निवेदनाची सातत्याने मागणी करत आहोत. पण सरकार काही बोलण्यास तयार नाही. देशातील तरुणांना याची उत्तरे हवी आहेत. सरकारने संसदेत आणि देशवासीयांना याचे उत्तर दिलेच पाहिजे, अशी मागणी खर्गे यांनी केली..'पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेची माफी मागावी'राम मंदिर दान चोरी प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी खुलासा करावा. पण त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी, कारण हा देशातील कोट्यवधी जनतेच्या आस्थेचा विषय आहे, अशी मागणी त्यांनी केली. या तीन मुद्यांवर कोणतीही तडजोड होणार नाही. त्यासाठी आम्ही लढत आहोत, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.