Solapur News: माढा तालुक्यात रब्बी हंगामाच्या सरासरी पेरण्या केवळ ३९ टक्केच झाल्या आहेत. पूरस्थिती, अतिवृष्टीमुळे जमिनी वाफशावर नसल्याने व शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमुळे पेरणी कमी झाली आहे. काही भागात अद्यापही पेरण्या सुरू आहेत. असे असले तरी फळबागा लागवडीत वाढ झाली आहे. नवीन ५३५ हेक्टरवर फळबागा लावलेल्या आहेत..सीना नदीकाठी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची मदत ही काही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. फार्मर आयडी नसणे, आधार अपडेट नसणे यासारख्या कारणांमुळे काही शेतकऱ्यांची मदत मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्यानेही पेरणीसाठी शेतकऱ्याने हात आखडता घेतला आहे. काही दिवसांत गहू, हरभरा यासारख्या पिकांच्या पेरणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे..Rabi Sowing: रब्बीचा पेरा पिछाडीवर.सरासरी पेरणी क्षेत्र ४० हजार ८७९ हेक्टर असून प्रत्यक्षात १५ हजार ९१३ हेक्टरवर पेरणी झाली असून, तालुक्यातील केवळ ३८.९३ टक्केच रब्बीची पेरणी झाली आहे. याशिवाय तालुक्यात पूर्वहंगामी उसाची २९८८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. रब्बी मका २२४३ हेक्टर, कडवळ १३७० हेक्टर, लुसर्न घास ५९० हेक्टर, नेपिअर ग्रास ३०१ हेक्टर अशी ४५०४ हेक्टरवर चारपिकांची लागवड केली आहे..फळबागांचे क्षेत्र तालुक्यातील १९ हजार ३१७ हेक्टरवर फळबागा असून, यंदा ५३५.२ हेक्टरवर नवीन फळबागा लागवड झाली आहे. (कंसात जुने क्षेत्र) आंबा ३९ (३८९), द्राक्षे २९ (२४०६), डाळिंब १०८ (७०९१), लिंबू ८ ( ७०१), पेरू ६२ (४९५), चिकू १ (२८०), सीताफळ ९ (२९४०), आवळा १ (११), नारळ १ (९५), बोर ३१ (६९०), जांभूळ ०० (२४०), चिंच ०० (३९०), केळी १४१ ( ३२९०), पपई ११ ( २९९), कलिंगड ५९ (००), खरबूज ३५ (००)..Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांची लगबग सुरू.माढा तालुक्यातील रब्बी हंगामाची स्थिती पीक सरासरी क्षेत्र पेरणी झालेले टक्केज्वारी २८२०५ ७७०८ २७.३३ टक्केमका ३५५४ ६७६७ १९०.४१ टक्के गहू ३००८ २१२ ७.०५ टक्के.हरभरा ४४८७ ११८६ २६.४३ टक्के भुईमूग -- ४० - - सूर्यफूल - - १५०० - -करडई - - २५ - -गळीत धान्ये १५२५ ४० २.६२ टक्के.भाजीपाला लागवड आकडेवारी हेक्टरमध्ये (कंसात सरासरी)कांदा ३९३९ ( ४८२५), टोमॅटो ३७४ (१८८४), मिरची २५४(९), वांगी १७३ (१०७९), भेंडी १३९ (१), दोडका ९८ (१२५), गवार २२५ (६), इतर भाजीपाला १५ (१२७), हळद १.९(००), आले १६ (१४), गुलाब ३५ (२), झेंडू १५१.४ (१३), शेवंती ४३ (२)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.