E Crop Survey: बुलडाणा जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेंतर्गत झालेल्या ज्वारी खरेदीच्या आकडेवारीवरून यंत्रणांचा स्तरावर संशय व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात पुरेशी लागवड झालेली नसताना अशा स्वरूपाची लाखो क्विंटल ज्वारी ही कोठून आली हा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी या विषयावर जिल्ह्यातील एका आमदारांनी विधी मंडळाच्या अधिवेशनातही मुद्दा मांडला. अद्याप याबाबत प्रशासनस्तरावरून ठोस काही झालेले दिसून येत नाही. .जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन आणि प्रत्यक्ष खरेदी यातील फरकामुळे या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील काही वर्षात ज्वारीचे पीक शेतकऱ्यांना परवडणारे राहलेले नाही. वन्यप्राण्यांचा त्रास, बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिवरली. खरिपात तर सरासरी क्षेत्र सहा हजार हेक्टरच्याही आत आहे. गेल्या खरिपात अवघी ५०३ हेक्टरवर पेरणी झाली होती. रब्बीत थोड्याफार अधिक क्षेत्रावर लागवड वाढली होती..Paddy Procurement: राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत, हजारो क्विंटल धान पडून, अतिरिक्त खरेदीला ब्रेक.मात्र, भरडधान्य योजनेत हमीभावाने (३६९९ रुपये) १ लाख ९२ हजार क्विंटल आकडा खरेदी प्रक्रियेवर संशय उपस्थित करू लागला आहे. जिल्ह्यातील ज्वारीचे क्षेत्र आणि खरेदीचे प्रमाण यामध्ये मोठी तफावत असल्याने ज्वारी ही परराज्यातून आणून विक्री केली गेली नाही ना, असे बोलले जात आहे. ई-पीक पाहणी, सात-बारा नोंदी आणि खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी केली जात आहे..Tribal Farmer Issue: हमीभावाच्या प्रतीक्षेत हजारो आदिवासी शेतकरी.या प्रकरणातील आणखी एक मुद्दा म्हणजे खरेदी झालेल्या ज्वारीच्या साठ्याबाबतची तफावत मानला जातो. पणन विभागाच्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात खरेदी दाखवण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी होत असून आमदार सिद्धार्थ खरात यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाकडून या आरोपांबाबत अद्याप कुठलीही ठोस भूमिका स्पष्ट झालेली नाही..जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन अत्यल्प असताना तब्बल १ लाख ९३ हजार क्विंटल ज्वारीची हमीभावाने झालेली खरेदी अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. एवढी ज्वारी आली कोठून? बाहेरच्या राज्यातील ज्वारी खोट्या सातबाराच्या आधारे ंखपवली गेली का? असे झाले असेल तर दलाल, खरेदी केंद्रचालक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लुटणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी.रविकांत तुपकर, शेतकरी नेते, बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.