Cotton Seed Distribution: खरीप हंगाम २०२६ मध्ये गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले. बियाण्यांची जादा दराने विक्री तसेच लिंकिंग पद्धतीने विक्री होणार नाही या बाबत सर्व कंपनी प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या..खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यातील विविध बियाणे कंपन्यांच्या जिल्हा प्रतिनिधींची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यामध्ये हे नियोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.डी.गरांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व्ही.पी. भोसले तसेच विविध बियाणे कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते..Kharif Seed Supply : खरिपासाठी ४५३९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा.कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. बियाणे गरजेपेक्षा जास्त उपलब्ध होणार असल्याने बियाणे तुटवडा जाणवणार नाही. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. नोंदणीकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.बियाणे खरेदीची पक्की बिल/पावती अवश्य घ्यावी व ती जतन करून ठेवावी..बियाण्याची बॅग पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करावीबियाण्यावरील टॅग, लॉट क्रमांक, उत्पादन तारीख व वैधता कालावधी तपासून घ्यावा. बियाण्यावरील उगवण क्षमता, शुद्धता व उत्पादक कंपनीचे नाव तपासावे.एमआरपीपेक्षा जादा दर आकारला जात नाही ना याची खात्री करावी. कोणत्याही प्रकारचे बियाणे, खते किंवा कीटकनाशके सक्तीने लिंकिंगद्वारे घेऊ नयेत. अनधिकृत विक्रेते, रस्त्याकडील विक्री किंवा संशयास्पद विक्रीपासून सावध राहावे. बियाणे पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करावी. .Cotton Sowing: शेतकऱ्यांना १ जूननंतरच कपाशी लागवडीच्या सूचना.उगवण किंवा गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास संबंधित कृषी अधिकारी यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा. पिकाच्या नुकसानीसंदर्भात तक्रार करण्यासाठी शेतात वापरलेल्या बियाण्याच्या रिकाम्या बॅग व पावत्या जतन करून ठेवाव्यात शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणांचा आग्रह धरू नये. बियाणे, खते, कीटकनाशके व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना अडचणी आल्यास राज्यस्तरीय, विभागीय तसेच जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा, असे बैठकीत सांगण्यात आले..काकडहिरा येथे दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिकपाटोदा तालुक्यामध्ये काकडहिरा या ठिकाणी कृषी उपसंचालक दादाराव जाधवर, आत्मा प्रकल्प उपसंचालक सूरज पाटील यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना भेट दिली. काकडहिरा येथे दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक, सोयाबीन उगम क्षमता तपासणी यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. त्यानंतर सामूहिकरीत्या नैसर्गिक शेतीची प्रतिज्ञा म्हणण्यात आली. .गांडूळ खत बेड, गांडूळ पाणी, गोकृपा अमृत, दशपर्णी अर्क हे तयार करण्यात आले. या प्रात्यक्षिकसाठी तालुका कृषी अधिकारी अतुल आंधळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्र.मंडळ कृषी अधिकारी मिसाळ, सहायक कृषी अधिकारी विद्या बडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बी. आर. तांबडे पाणी फाउंडेशनचे श्री घोलप, भरत कवठेकर, सूर्यवंशी, शेतकरी उपस्थित होते..तक्रारीसाठी संपर्काकरिता क्रमांकराज्यस्तरीय टोल फ्री क्रमांक : १८००२३३४०००छ. संभाजीनगर विभागस्तरीय : ९४२१२३३२७०जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्ष : ९४०३३०८६०८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.