Political Development Issues: राज्याला दोन मुख्यमंत्री देणारा पुसद मतदारसंघ विकासाच्या अनेक मूलभूत बाबींमध्ये अद्यापही मागे असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकेकाळी जिल्हा होण्याच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या पुसदला राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अपेक्षित विकास साधता आला नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आजही भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत..तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग कार्यालय तसेच वजनमाप नियंत्रण कार्यालय यांसह विविध विभागांची कार्यालये स्वतःच्या प्रशासकीय इमारतीअभावी भाड्याच्या जागेत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असून वेळ आणि पैशाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. .Maharashtra Cabinet Decisions: शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय.या समस्येवर उपाय म्हणून सन २०११-१२ मध्ये काकडदाती येथील सुतगिरणीसमोरील जागेवर सुमारे १७ शासकीय कार्यालये एकाच संकुलात उभारण्यासाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र विविध कारणांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही..Government Employees Relief GR: १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, संप काळातील अनुपस्थिती नियमित, शासन निर्णय जारी.हा प्रकल्प मार्गी लागला असता तर नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी पायपीट मोठ्या प्रमाणात कमी झाली असती. दरम्यान, शासनाच्या मालकीच्या अनेक इमारती आणि जागा देखील दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र आहे. वरूड येथील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने अनेक वर्षांपासून मोडकळीस आली असून वापराअभावी धुळखात पडली आहेत..दृष्टिक्षेपाततालुक्यातील अनेक शासकीय कार्यालये अद्याप भाड्याच्या जागेत कार्यरत.सन २०११-१२ मध्ये १७ कार्यालयांच्या प्रशासकीय संकुलासाठी १४ कोटी रुपये मंजूर.प्रकल्प अपूर्ण राहिल्याने नागरिकांची पायपीट कायम.वरूड येथील पाटबंधारे विभागाची निवासस्थाने मोडकळीस.पंचायत समितीची क्वार्टर्स जीर्ण; काही शासकीय जागांवर अतिक्रमण.शासकीय जागांचा लोकोपयोगी विकासासाठी वापर करण्याची नागरिकांची मागणी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.