Jambhul Medicinal Value : जांभळाचे साल, पानास औषधी मूल्य

Jambhul Benefits : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, त्यामुळे मधुमेही रुग्णांना जांभळाच्या हंगामात त्याचा नियमित वापर केल्यास फायदा होतो.
Jambhul
JambhulAgrowon

श्रेयस डिंगोरे, डॉ. कैलास कांबळे

Medicinal Quality of Jambhul : जांभूळ वृक्ष हा सदाहरित प्रकारात मोडतो. हा वृक्ष ३० ते ३५ फूट उंचीपर्यंत वाढतो. साधारणपणे हे झाड लागवडीनंतर ३५ ते ४० वर्षे फळ देते. याचे सामान्य आयुर्मान ५० ते ६० वर्षे असते. पाने सुवासिक ग्रंथीयुक्त असतात. फुले नाजूक पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो, शेवटास फळ तयार होते. फळे अंडाकृती असतात. अर्धपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची, तर पूर्णपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून पाण्यात कुजत नाही.

औषधी गुणधर्म आणि फायदे

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, त्यामुळे मधुमेही रुग्णांना जांभळाच्या हंगामात त्याचा नियमित वापर केल्यास फायदा होतो.

मधुमेहींना वारंवार तहान लागणे आणि लघवीला जाणे यांसारख्या समस्यांवर उपाय.

पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते, जे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात टाळण्यास मदत करते.

रक्ताची कमतरता असेल तर भरपूर जांभूळ खावीत. कारण ते शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.

कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे विविध पोषक घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढतात.

उलट्या, जुलाब किंवा कॉलरा यांसारख्या समस्या असतील तर ते पाण्यासोबत रसाचे सेवन करावे.

पोटातील जंत, दमा, खोकला आणि इतर आजारांपासूनही आराम मिळतो.

जांभूळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्या दूर होतात. तोंडात फोड येत असल्यास जांभळाचे सेवन फायदेशीर ठरते.

ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर फळामध्ये काळे मीठ आणि जिरे पावडर वापरल्याने फायदा होईल.

पावसाळ्यात संक्रमणाशी लढण्याची क्षमता देतात.

Jambhul
Medicinal Plant Farming : औषधी वनस्पती मूल्यसाखळी प्रकल्पांना २५ लाखापर्यंत अनुदान

विविध जातींची वैशिष्ट्ये :

ठरावीक प्रताजीचे नाव नसलेली जांभळाची झाडे सर्वत्र आढळतात. फळे आकाराने लहान व चवीला थोडी आंबट असतात.

‘कोकण बहाडोली’ ही जात प्रादेशिक फळ संशोधन संस्था, वेंगुर्ला येथून प्रसारित झाली आहे. फळ वजनाने अधिक असते (२५ ते २८ ग्रॅम) गराचे प्रमाण देखील साधारणतः ८३.३ टक्के असून, एक किलोमध्ये ४० ते ५० नग (फळे) बसतात.

केंद्रीय फलोत्पादन प्रयोग केंद्राने (वेजलपूर, गुजरात) ‘गोमा प्रियंका’ ही जात विकसित केली आहे. ही प्रामुख्याने अंशतः ठेंगणी (लहान), दाट पसरणारी व झुकणाऱ्या फांद्या असणारी व लवकर फळ देणारी जात आहे. फळांचे वजन १९ ते २० ग्रॅम आणि गर ८५ टक्के असतो.

‘धूपदल’ ही जात बेळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. फळ हे गोड व मोठे असते.

केंद्रीय समशीतोष्ण बागायती संस्थेने (लखनौ) सीआयएसएचजे -४२ आणि सीआयएसएच-३७ या दोन जाती विकसित केल्या आहेत. याचे फळे मोठे असते. ९७ ते ९८ टक्के गर असतो. साखरेचे प्रमाण १६ ते १७ ब्रिक्स असते.

बिहार कृषी महाविद्यालयाने (भागलपूर, बिहार) ‘राजेंद्र जामून-१’ ही जात विकसित केली आहे.

आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने (उत्तर प्रदेश) ‘नरेंद्र जामून-६’ ही जात विकसित केली आहे. फळाचा आकार आयताकृती लंबगोल, रुंदीपेक्षा लांबी मोठी असते.

फळातील अन्नघटक (प्रति १०० ग्रॅम)

३९-६२ कॅलरी ऊर्जा, ०.५३-०.६५ % प्रथिने, १४ % कर्बोदके, ८३.७ -८५.८० % आर्द्रता.

२.३-३.७% पेक्टिन, ८.३०-१५.०% कॅल्शिअम, ०.८-१.२ मिलिग्रॅम लोह, ०.२३% तांबे.

१०.७०-२९.५२ मिलिग्रॅम क जीवनसत्त्व, २६.२० मिलिग्रॅम सोडिअम, २०१.५०-३८६.२५ मिलिग्रॅम टॉनिस, ११५.३८-२१०.७६ मिलिग्रॅम ॲन्थोसायानिन.

फळाचे वजन १०.५५ ग्रॅम, बियांचे वजन १.९० ग्रॅम, फळांच्या सालीचे वजन ०.८५ ग्रॅम, गराचे वजन ६.६ ग्रॅम असून गर : बिया यांचे प्रमाण ३:४७ इतके असते. मधुमेहविरोधी, अँटिऑक्सिडंट, अँटिॲलर्जिक, कर्करोगविरोधी, ट्युमरविरोधी, सूक्ष्मजीवविरोधी, दाहकता विरोधी गुणधर्म.

उत्पादने : जाम, जेली, कुल्फी, शीत पेय, सरबत, आइस्क्रीम, काढा, कँडी, बियांची पावडर, पानांची पावडर.

जांभूळ वृक्षातील फायटोकेमिकल :

बिया : जांबोसीन, गॅलिक ॲसिड, इलाजीक ॲसिड, कोरीलाजीन, ३,६-हेक्झा-हायड्रॉक्सिडायफिनाइल-ग्लुकोज, १-गॅलोइल-ग्लुकोज, ३-गॅलोइल-ग्लुकोज, क्युसरटीन, बीटासीटोटेरॉल, ४,६-हेक्झा हायड्रॉक्सि-डायफिनाइल ग्लुकोज इत्यादी.

देठाची साल : फ्रायडेलीन, फ्रायडेलान-३-०-०१, बेटुलीनीक ॲसिड, बीटासीटोस्टेरॉल, काम्फेरॉल, बीटासीटोस्टेरॉल- डीग्लुकोसाईड, गॅलीक अॅसिड, इलाजिक अॅसिड, गॅलोटॅनीन इत्यादी.

पाने : बीटासीटोस्टेरॉल, बेटुलिनिक अॅसिड, मायकामीनोज, काटेगोलिक अॅसिड, एन-हेप्टकोसेन, एन-नोनॅकोसेन, एन-हेन्द्रीयाकॉन्टेन, नोक्टॅकोसॅनोल, एन- टायअँटोकॉन्टॅनॉल, एन- डोटीकॉन्टॅनॉल, क्युसरटीन, मायरीसेटीन, मायरीसीटीन, फलेव्हॅनॉलग्लायकोसाइडस, मायरीसेटीन, ३-व-एल रॅम्नोपायरॅनोसाइडस, इत्यादी.

फुले : ओलेनोलिक अॅसिड, इलॅजिक अॅसिड, आयसो-क्वेर्स्टीन, क्वेर्स्टीन, केम्पफेरॉल आणि मायरिसेटिन.

फळांचा गर : अँथोसायनिन्स, डेल्फिनिडिन, पेटुनिडिन, मालविडिन-डिग्लुकोसाइड्स.

आवश्यक तेल : टेर्पेनॉल, मायर्टेनॉल, युकारव्होन, १,८- सिनिओल, -मायर्टेनल, म्युरोलोल, -कॅडिनॉल आणि पिनोकार्वोन.

पानांवर प्रक्रिया :

पानातील अन्नघटक व त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता पाने तोडून व वाळवून त्याची पावडर तयार केली तर ती टिकून राहते.

पानांपासून अर्क काढण्याच्या पद्धती सॉक्लेट एक्सट्रॅक्शन, उल्ट्रसोनिकेशन असिस्टेड एक्सट्रॅक्शन, मायक्रोवेव्ह असिस्टेड एक्सट्रॅक्शन, जलधार पद्धत, अक्वियस पद्धत, मासरेशन पद्धत.

पाने वाळवण्याचा पद्धती : सावलीत वाळवणे, टनेल ड्राइंग,मेकॅनिकल ड्राइंग.

Jambhul
Medicinal Plants : गणेशपत्रींचे औषधी महत्त्व

बियांचे फायदे

मधुमेहाच्या रुग्णांना जांभळाच्या बियांच्या पावडरचे नियमित सेवन केल्याने मदत होते.

जखम किंवा फोड आला असेल तर बियांची पावडर तयार करून त्यात पाणी घालून पेस्ट बनवून जखमेवर लावावी.

बियांचे चूर्ण सेवन केल्यानेही आमांशात आराम मिळतो. यासाठी एक चमचा दिवसातून तीन वेळा सेवन करावे.

किडनी स्टोन झाला असेल तर जांभळाची पूड दह्यासोबत सेवन केल्याने आराम मिळतो.

रक्तस्रावाची समस्या असल्यास बियांच्या पावडरीमध्ये १/४ पिंपळाची साल चूर्ण मिसळून खाल्ल्यास आराम मिळतो.

लहान मुले रात्री अंथरुणावर लघवी करत असतील, तर त्याला ठरावीक प्रमाणात जांभूळ बियांची पावडर खाऊ घालणे चांगले असते.

आवाज मधुर बनवायचा असेल, तर बियांची पावडर मधासोबत घेतल्याने फायदा होतो.

पानाचे फायदे

जांभळाच्या पानांची राख हिरड्यांवर घासल्यास त्या मजबूत होण्यास मदत होते.

हिरड्यांमधून रक्तस्राव होत असेल किंवा हिरड्यांच्या इतर समस्या असतील, जसे की सूज; मऊ जांभळाची पाने पाण्यात उकळून या पाण्याने धुतल्यास फायदा होईल.

श्‍वासोच्छ्वासाचा त्रास होत असेल, तर जांभळाची पाने चावल्याने फायदा होतो.

गाईच्या दुधासोबत जांभळाच्या पानांचे सेवन केल्याने रक्तस्रावात फायदा होतो.

सालाचे फायदे

पोटात मुरड येणे हा त्रास होत असल्यास सालीचा रस प्यायल्याने फायदा होतो.

लहान मुलांना जुलाब होत असल्यास सालीचा रस शेळीच्या दुधात उकळून थंड करून प्यायल्यास फायदा होतो.

अतिसारामध्ये गर्भवती महिलांसाठी जांभळाची साल चांगली असते. साल पाण्यात उकळून एकचतुर्थांश पाणी शिल्लक असताना ते २ ते ३ वेळा गाळून त्यात धने, जिरे पूड मिसळावी. हे मिश्रण प्यायल्याने आरोग्य चांगले राहते.

सांधेदुखीच्या उपचारातही जांभळाची साल फायदेशीर आहे.

साल बारीक करून दिवसातून दोनदा पाण्यासोबत सेवन केल्याने अपचन, पोटदुखीचा त्रास दूर होतो.

दीर्घ काळ बद्धकोष्ठतेच्या समस्या, उलट्या, जुलाब, मधुमेहामध्ये जांभळाच्या व्हिनेगरचे वारंवार सेवन केल्याने फायदा होतो.

डॉ. कैलास कांबळे, ९४०४७८५८४

(प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com