Sangali News : जनावरांच्या औषधांची खरेदी रखडली

Sangali Z.P. Animal Husbandry Department : सांगली जिल्ह्यातील स्थिती; स्वीय निधी अडकला
Animal vaccination
Animal vaccinationAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Animal care : सांगली ः स्वीय निधीतील सुमारे ४० लाखांची जनावरांच्या औषधांची खरेदी अधिकाऱ्यांच्या घोळात रखडल्याची चर्चा आहे.

ही औषधे जिल्हा परिषद स्तरावर खरेदी करायची की पंचायत समिती स्तरावर, यावरून अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने ही खरेदी रखडली आहे. मात्र या घोळात निधी परत जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना वर्षाला लागणारी विविध प्रकारची सुमारे ४० ते ५० लाखांची औषधे स्वीय निधीतून खरेदी केली जातात. ती तालुक्यांना वितरित केली जातात. पण जानेवारी महिना सुरू झाला तरी या वर्षाची औषधे अद्याप खरेदी केलेली नाहीत. पशुसंवर्धन विभागाने औषधे खरेदीची प्रक्रिया सुरू केली.

मात्र औषधे पंचायत समिती स्तरावरून खरेदी करावी, असे एका अधिकाऱ्याचे मत झाले, तर जिल्हा परिषद स्तरावरून खरेदी करावी, असे दुसऱ्या अधिकाऱ्याचे मत झाले. गेल्या दीड महिन्यापासून हा घोळ मिटला नसल्याने खरेदीचा प्रस्ताव पडून असल्याची चर्चा सुरू आहे. यात औषधांचा तुटवडा सुरू असून आवश्यक औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून येऊ लागल्या आहेत.

Animal vaccination
Kolhapur Lumpy News : लम्पीने दगावलेल्या जनावरांच्या पंचनाम्यासाठी डॉक्टर मागतात पैसे

दरवर्षी नोव्हेंबरपर्यंत औषध खरेदी केली जाते. मात्र यंदा जानेवारी उजाडला तरी औषधे खरेदी झाली नाहीत. जीएम पोर्टलद्वारे खरेदीसाठी आठवडाभराचा कालावधी जातो.

ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अर्धा जानेवारी महिना गाठणार आहे. खरेदीनंतर बिले काढण्यास दीड ते दोन महिने लागणार असल्याने ही बिले मार्चच्या खर्चात पडण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.


औषधे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू
जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी औषधे खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. १९ प्रकारची सुमारे ४० लाखांची औषध खरेदी आठवडाभरात होईल. औषधांचा तुटवडाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com