Punjab Flood Crisis: पंजाबला पुराचा तडाखा; १२०० गावे जलमय, ३० जणांचा मृत्यू तर शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान
Heavy Rainfall Issue: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. सतलज, बियास, रावी आणि घग्गर या नद्यांना पूर आल्याने अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. राज्यातील २३ पैकी १२ जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.